first picture of anushka sharma and virat kohli daughter vamika  Twitter
मनोरंजन

Vamika: 'हे चुकीचं आहे', अखेर वामिकाच्या फोटोवरुन झाला वाद

सोशल मीडियावर विराट-अनुष्काच्या लेकीची म्हणजेच वामिकाची बरीच चर्चा आहे.

स्वाती वेमूल

केपटाऊन वनडेमधल्या (Capetown oneday) भारताच्या पराभवापेक्षा, सोशल मीडियावर विराट-अनुष्काच्या लेकीची म्हणजेच वामिकाची बरीच चर्चा आहे. या सामन्यादरम्यान अपघाताने विराट-अनुष्काची (Virat-Anushka) लेक वामिकाचा चेहरा माध्यमांसमोर आला. विराट-अनुष्काने आतापर्यंत वामिकाचा (Vamika) चेहरा कोणालाही पाहू दिला नव्हता. पण मॅच सुरु असताना सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीच्या कॅमेरामनने कॅमरा अनुष्का उपस्थित असलेल्या प्रेक्षक गॅलरीकडे वळवला. त्यावेळी प्रथमच वामिकाचा चेहरा सर्वांनी पाहिला. यावरुन टि्वटरवर अनेक युजर्सनी सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला सुनावलं आहे. ब्रॉडकास्टर्सनी विराट-अनुष्काच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप केलाय, असं अनेक युजर्सचं मत आहे.

रविवारी सामन्याचं लाइव्ह टेलिकास्ट सुरु असताना कॅमरामनने प्रेक्षक गॅलरीकडे कॅमेरा वळवला. त्यावेळी अनुष्काने वामिकाला हातात पकडलं होतं. काही सेकंदांसाठीच विराटच्या मुलीची पहिली झलक जगाने पाहिली. पण तो व्हिडिओ आणि फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. "ब्रॉडकास्टर्सनी विराट-अनुष्काच्या खासगी आयुष्याचा आदर केला पाहिजे". "विराट आणि अनुष्काने परवानगी दिलेली नसताना, त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवून सुपरस्पोर्टने चूक केलीय" असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे"

वामिकाचा फोटो दिसल्यानंतर काही नेटीझन्सनी लगेच त्याचा व्हिडिओ आणि स्क्रिनग्रॅब बनवून पोस्ट केले. नेटीझन्सची ही कृती सुद्धा फॅन्सना पटलेली नाही. वामिकाचे फोटो पोस्ट करणाऱ्यांना टि्वट डिलीट करण्याचाही सल्लाही देण्यात आला आहे. विराट-अनुष्काचा आदर करता तर ते फोटो डिलीट करा असे एका युजरने म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT