fans throw water bottle at mc stan during hyderabad concert video viral sakal
मनोरंजन

MC Stan: एमसी स्टॅनवर फेकून मारली बॉटल.. हैदराबातच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल..

एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये राडा! स्टेजवर गात असतानाच फेकून मारली बॉटल..

नीलेश अडसूळ

bigg boss fame rapper MC Stan: रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यापासून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत, त्याने भल्या भल्या बॉलीवुड सेलेब्रिटींनाही मागे टाकले आहे. सध्या एमसी रस्त्यावर उतरला तरी हजारोंची गर्दी त्याला पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरलेल्या एमसी स्टॅनची सध्या देशभरात हवा आहे. कारण तो भारत दौऱ्यावर आहे, मागेच त्याने त्याच्या या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानुसार भारतातील अनेक ठिकाणी त्याच्या कॉनसर्ट होणार आहेत. याच दौऱ्या दरम्यान हैदराबाद येथील कॉनसर्ट मध्ये एक राडा झाला, त्याचा विडिओ व्हायरल होत असून चर्चेचा विषय झाला आहे.

(fans throw water bottle at mc stan during hyderabad concert video viral)

शुक्रवारी १० मार्चला हैदराबाद येथे एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट पार पडला. याच कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एमसी वर हल्ला झाल्याचे दिसत आहे.

झाले असे की, हैदराबादमधील एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टसाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. स्टॅन स्टेजवर गात असताना गर्दीतून पाण्याची बाटली त्याच्यावर फेकण्यात आली. पाण्याची बाटली स्टॅनच्या बाजूला पडल्यामुळे त्याला ती लागली नाही किंवा कोणतीही दुखापत झाली नाही.

पण एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर स्टनने हैदराबादमधील त्याचं कॉन्सर्ट काही वेळ थांबवल्याचेही बोलले जात आहे.

‘बिग बॉस हिंदी’चं विजेतेपद मिळवल्यानंतर एमसी स्टॅनला अनेक ब्रँडच्या ऑफर मिळाल्या. त्याला बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद यांच्याकडूनही गाण्याची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. लवकरच तो बॉलीवुड चित्रपटातही झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Jan Dhan Account: जन धन खात्यांवरही 'या' सुविधा मिळणार, आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर...

Korewadi Protest : राजश्री राठोड यांचे कोरडेवाडी तलाव मंजुरीसाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा; शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस

Rana Jagjit Singh Patil : भाजपाचे आमदार राणा पाटील यांचे विद्यमान आमदार व खासदार यांना शह देण्यासाठी परंडा मतदारसंघात दौरे

Ruturaj Gaikwad ने सूर मारला अन् जमिनीलगत अफलातून कॅच घेतला, विदर्भाचा डावही संपवला; पाहा Video

SCROLL FOR NEXT