fardeen khan 
मनोरंजन

फरदीन खानचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'फॅट टू फिट'च्या प्रवासात मुलांची मदत

स्वाती वेमूल

प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आणि अभिनेता फरदीन खान हा चित्रपटसृष्टीपासून जरी लांब असला तरी आता एका विशेष कारणासाठी तो प्रकाशझोतात आला आहे. मुंबईतील एका हेअर सलूनमधून बाहेर पडताना फरदीनला पाहिलं गेलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. फरदीनने त्याचं वजन बरंच कमी केलं असून त्याचा फिट अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. फरदीन इंडस्ट्रीपासून दूर आहे. मध्यंतरीच्या काळात त्याचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्याचं वजन बरंच वाढलेलं दिसत होतं. पण आता पुन्हा एकदा पहिल्या रुपात पाहायला मिळतोय. त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांना फारच आवडलं असून त्याने वजन कमी कसं केलं, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. 

'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत फरदीन त्याच्या फिटनेसविषयी म्हणाला, "मानसिक स्वास्थ्याचा परिणाम थेट तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावरही होतो. माझ्या कठीण काळात मुलगी डियाना आणि मुलगा अझारियस यांनी माझी खूप मदत केली. माझ्या मुलीला स्केटिंग, सायकलिंक आणि माझ्या मुलाला बागेत पळायला खूप आवडतं. वडील म्हणून मलासुद्धा त्यांच्यासोबत विविध खेळ खेळायची, फिरायला जायची आवड होती. पण या गोष्टी करण्यासाठी फिट राहणं सर्वांत महत्त्वाचं होतं. त्यामुळे पत्नी नताशाच्या मदतीने मी माझं वजन कमी केलं", असं त्याने सांगितलं. 

फरदीन खानने नव्वदच्या दशकात 'प्रेम अगन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याने 'लव्ह के लिए कुछ भी करेगा', 'ओम जय जगदीश', 'हे बेबी', 'खुशी', 'ऑल द बेस्ट' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. २०१० मध्ये 'दुल्हा मिल गया' या चित्रपटात त्याने शेवटचं काम केलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT