Farhan Akhtar and Shibani Dandekar' Google
मनोरंजन

'दांडेकर-अख्तर' वेडिंग पार्टीत ब्लॅक मॅजिक?

लग्नानंतर मुंबईत या 'न्यूली मॅरिड कपल्स'साठी पार्टीचं आयोजन केलं होतं.

प्रणाली मोरे

शिबानी दांडेकर (Shibani Danddekar) आणि फरहान अख्तर(Farhan Akhtar) यांचं लग्न अगदी साध्या पण सुंदर पद्धतीनं खंडाळा येथील जावेद अख्तर यांच्या फार्म हाऊसवर पार पडलं. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. यांच्या लग्नाची चर्चा रंगली ती आगळ्या-वेगळ्या विवाह पद्धतीनं. या दोघांच्या लग्नात ना सप्तपदीचे सूर घूमले,ना कबूल है ऐकायला मिळालं. तर या दोघांनी एकमेकांना सात वचनं दिली,जी सर्वांसमोर माईकवर त्यांनी वाचून दाखवली. थोडक्यात ख्रिश्चन धर्माच्या पद्धतीत हे लग्न पार पडलं.

अपेक्षा होती मराठमोळी शिबानी दांडेकर छान नववारीत दिसेल,भरजरी दागदागिने घालून सजेल आणि फरहान मस्त धोतर घालून मिरवेल. पण तसं काहीच झालं नाही या दोघांनी एकदम वेगळाच पेहराव केलेला दिसला. ज्यात शिबानीनं लाल रंगाचा गाऊन घातला आहे आणि फरहाननं काळा कोट परिधान केला होता. अर्थात लग्नात काही खास लोकांची उपस्थिती आणि त्यांनी केलेली धमाल लक्षवेधी होतीच यात शंकाच नाही. कोर्ट मॅरेजही दोघांनी केलं पण त्यानंतर झालेली पार्टी सध्या गाजतेय. काय झालं त्या पार्टीत....खरंच ब्लॅक मॅजिक संदर्भात काही दिसून आलं का...तर हो,पण काय ते वाचा सविस्तर

तर लग्नानंतर मिस्टर अॅन्ड मिसेस अख्तर यांच्यासाठी निर्माता रितेश सिधवानीनं दणक्यात पार्टी दिली ज्यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीत शिबानी-फरहानच्या घरच्या मंडळीं व्यतिरिक्त 'कपूर-अरोरा' गर्ल गॅंग आवर्जुन उपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच विद्या बालन तिचा नवरा सिद्धर्थ रॉय कपूरसोबत आली होती. दीपिका पदूकोण,अर्जुन रामपाल आणि त्याची परदेशी गर्लफ्रेंड,रितेश-जेनेलिया देशमुख,सोहा अली खान-कुणाल खेमू,तारा सुतारिया,सिद्धांत चतुर्वेदी,ईशान खट्टर,अनन्या पांड्ये,रिया चक्रवर्ती अशा अनेकांनी उपस्थिती दर्शवली होती. आता आपण म्हणाल पाहुण्यांची लिस्ट झाली वाचून,ब्लॅक मॅजिक प्रकरण काय ते सांगा आधी. तर हो,सांगतो. कारण त्या ब्लॅक मॅजिक विषयावर येण्यासाठी ही पाहुण्यांची लिस्ट वाचून दाखवणं गरजेचं होतं म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप.

Kareena Kapoor, Karishma Kapoor, Malaika Arora and Amrita Arora

तर या पार्टीत ब्लॅक मॅजिक थोडं सकारात्मक पद्धतीनं घ्यायला हवं. आम्हाला कुठल्याही अंधश्रद्धेला बढावा द्यायचा नाही. तर या पार्टीत 'कपूर-अरोरा' गर्ल गॅंग आपल्या काळ्या रंगाच्या पेहरावात मॅजिक करून गेल्या म्हणून ते म्हटलं 'ब्लॅक मॅजिक'. पन्नाशी गाठायला आलेल्या करिष्मा आणि मलायका या आपल्या ब्लॅक ड्रेसमध्ये जरा जास्तच भाव खाऊन गेल्या. तर करिना आणि अमृता या नुकतीच ४० शी पार केलेल्या बाला अनेकांचे डोळे दीपवून गेल्या हे मात्र नक्की. मलायकाचा ड्रेस खरंतर म्हणावा लागेल या ब्लॅक मॅजिकवरचा कळसच. तिनं तो उत्तम कॅरी केला खरा पण ट्रोलर्सनी नेहमीप्रमाणे तिला इथंही सोडलं नाहीच. असो,तर अख्तर-दांडेकर लग्नाच्या त्या पार्टीत कपूर-अरोरा गर्ल्स लोकांवर अशा पद्धतीनं ब्लॅक मॅजिक करून गेल्या आहेत की आज दोन दिवस झाले तरी चर्चा पार्टीपेक्षा त्यांचीच होतेय ना राव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT