Farmani Naaz Violate Copyright Act Copies har har shambhu song writer Jeetu Sharma blame Google
मनोरंजन

'Farmani Naaz खोटारडी, हर हर शंभू गाणं माझंच', गीतकार जीतू शर्माचा आरोप

हर हर शंभू गाण्याला आपलं ओरिजनल गाणं सांगणाऱ्या फरमानी नाझच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत जीतू शर्मा आहे.

प्रणाली मोरे

Farmani Naaz: हर हर शंभू (Har Har Shambhu) गाणारी फरमानी नाझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हर हर शंभू गाण्याला आपलं ओरिजनल गाणं सांगणाऱ्या फरमानी नाझच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याचं झालं असं की,हर हर शंभू गाण्याचा मूळ गीतकार जीतू शर्मा फरमानीच्या विरोधात कॉपीराइट अॅक्ट अंतर्गत केस ठोकण्याचा विचार करत आहे. एका न्यूज पोर्टलशी बातचीत करताना त्यानं आपण फरमानीवर नाराज असल्याचं सांगितलं आहे.(Farmani Naaz Violate Copyright Act Copies har har shambhu song writer Jeetu Sharma blame)

जीतू शर्माने फरमानी नाज विरोधात नाराजगी जाहीर केली आहे. जीतू म्हणाला आहे की,''मला तिनं गाणं गायलं यासंदर्भात काहीच म्हणायचं नाही. पण ती प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतेय की ते गाणं तिचं स्वतःचं ओरिजन गाणं आहे,जे पूर्णपणे चुकीचं,खोटं आहे. तिनं मला गीतकार म्हणून जर क्रेडिट दिलं असतं तर माझा काहीच विरोध नव्हता. फरमानीनं कॉपीराइटचा नियम तोडला आहे. जर ती माफी मागणार नाही तर मी कायदेशीर कारवाई करणार''.

जीतूने सांगितले आहे की आतापर्यंत त्याच्या हर हर शंभू गाण्याचे ३१० व्हर्जन बनले आहेत. त्यानं आपल्या या गाण्याच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे की,''या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी माझ्याकडे पैसे नव्हते,तर मी माझी एक गाडी फक्त ६० हजारात विकली होती. ज्याची किंमत खरंतर अधिक यायला हवी होती. पण ती माझी शेवटची संधी होती. जर गाण्याला यश मिळालं नसतं तर मी युट्युबला कायमचा राम राम ठोकला असता. इतक्या संघर्षानंतर हे गाणं तयार झालं,पण आज मनाला खूप दुःख होतं जेव्हा कोणी येऊन सांगतं की हे गाणं फरमानी नाझचं आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT