मनोरंजन

नुसरतच्या मुलाच्या बाबांचं नाव समजलं! : रजिस्ट्रेशन डिटेल व्हायरल

बांग्ला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नुसरत जहानं (Nusrat Jahan) मोठं नाव कमावलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बांग्ला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नुसरत जहानं (Nusrat Jahan) मोठं नाव कमावलं. आता ती लोकसभेत खासदार आहे. लोकांचे प्रश्न संसेदत मांडते. असं असलं तरी तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले आहेत. एखाद्या महिला लोकप्रतिनिधीवर अगदी खालच्या पातळीवर जावून आरोप करण्यात आले आहे. तिला झालेल्या मुलाचे वडिल कोण यावरुनही तिला ट्रोल करण्यात आले होते. मात्र आपल्यावर टीका करणाऱ्यांना पुरुन उरणाऱ्या नुसरतचा सोशल मीडियातील प्रभाव वाढला आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे त्याचे कारण तिच्या मुलाच्या वडिलांचे नाव समोर आले आहे. सोशल मीडियामध्ये त्यावरुन चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासुन नुसरतला त्या प्रश्नानं हैराण केल्याचेही दिसून आले आहे.

26 ऑगस्टला नुसरतनं (Nusrat Jahan)गोड बातमी दिली. तिनं एका मुलाला जन्म दिल्याची बातमी एव्हाना सगळ्या मीडियानं लोकांना सांगितली होती. मात्र याचवेळी त्या मुलाचे वडिल कोण हा प्रश्नही अनेकांना सतावत होता. त्यावरुन नुसरला ट्रोल करण्यात आले होते. वास्तविक तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असणाऱ्या या प्रश्नावर संसदेतही काहींनी टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. मीडिया प्रतिनिधींना नुसरत दिसायचा अवकाश की तिच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या अफवाही पसरलेल्या दिसत आहेत. त्याचं झालं असं की, नुसरतनं आपला घटस्फोटीत पती निखिल जैनवर जेव्हा बाप असल्याचा आरोप करण्यात आला होता तेव्हा नुसरतनं त्याचा काही संबंध नसल्याचे सांगितलं होतं.

आता मुलाच्या वडिलांचं नाव समोर आलं आहे. त्या मुलाच्या वडिलांचं नाव हे यश दासगुप्ता (Yash Dasgupta) असं आहे. डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. नुसरच्या मुलाचा जन्माचा जो दाखला आहे त्यावर ही माहिती देण्यात आली आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यासंबंधीची अधिक माहिती ही कोलकत्ता महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आता त्याचे आणि त्याच्या मुलाचे नाव पब्लिक डोमेनमध्ये आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT