Fawad Khan Pakistani film the legend of maula jatt release in india threat mns ameya khopkar Google
मनोरंजन

Fawad Khan या पाकिस्तानी अभिनेत्याचा सिनेमा भारतात रिलीज करण्यावरनं खळबळ, मनसेनं घेतला आक्रमक पवित्रा..

मनसे नेता अमेय खोपकर यांनी २०१६ मध्ये देखील फवाद खान अभिनय करत असलेल्या 'कपूर अँड सन्स' या चित्रपटाला विरोध केला होता.

प्रणाली मोरे

Fawad Khan फवाद खान आणि माहिरा खान स्टारर पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तानसोबतच 'द लीजेंड ऑफ मौला जट' जगभरातही खूप लोकप्रिय होत आहे. भारतातही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू असल्याची बातमी अलीकडेच आली होती. 23 डिसेंबर ही चित्रपटाची रिलीज डेटही निश्चित करण्यात आली होती, मात्र आता चित्रपट रिलीज होण्याआधीच यावरून भारतात वाद सुरू झाला आहे.(Fawad Khan Pakistani film the legend of maula jatt release in india threat mns ameya khopkar)

पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' जगभरात लोकप्रिय झाला आहे.पण हा भारतात प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) अमेय खोपकर यांनी 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानी चित्रपट कोणत्याही परिस्थितीत भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी दिली आहे. इतकेच नव्हेतर त्यांनी मौला जट मध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता फवाद खानच्या चाहत्यांना 'देशद्रोही' म्हटले आणि चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांना थेट धमक्याही दिल्या.

अमेय खोपकर यांनी शुक्रवारी जाहीर इशारा देत पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'द लिजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी दिली आहे. फवाद खानचा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याविषयी अमेय खोपकरने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'द लिजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याची योजना आहे. ही सर्वात त्रासदायक गोष्ट आहे "जर हा चित्रपट बघायचा असेल तर पाकिस्तानात खुशाल जा" राज ठाकरेंच्या आदेशानंतर आम्ही हा चित्रपट भारतात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही. अमेय खोपकर यांनी २०१६ मध्ये फवाद खान अभिनय करत असलेल्या 'कपूर अँड सन्स' या चित्रपटाला विरोध केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Maharashtra : पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई! नीट पेपरफुटी प्रकरणात तेजस शाहसह आणखी एकाला अटक

Petrol-Diesel Saving : पेट्रोल-डिझेल महाग झालं! पण चिंता कशाला? गुगल मॅप्सचं 'हे' जादुई फीचर वाचवत आहे लाखो लोकांचे पैसे

Byju’s Founder Jail : 'बायजू'चे संस्थापक रविंद्रन यांना सिंगापूरच्या न्यायालयाचा झटका, ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Pune DNA Barcode: पुण्यात पहिले झुरळ डीएनए बारकोड ग्रंथालय; शास्त्रज्ञांचे संशोधन, शंभरहून अधिक प्रजातींची माहिती, काय आहे संकल्पना?

Viral Video: मृत पिल्लाला रात्रभर सोंडेने उठवण्याचा प्रयत्न करत राहीली एक असहाय्य आई... हत्तीणीची वेदना पाहून गावकरीही रडले

SCROLL FOR NEXT