मनोरंजन

फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र; चित्रिकरणावेळी नियम पाळण्याचे दिले आश्वासन

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजने (एफडब्ल्यूसीई) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये चित्रीकरण सुरू झाल्यावर सेटवर कामगार आणि सर्व तंत्रज्ञ कशाप्रकारे काळजी घेतली जाईल आणि यासाठी कोणते नियम (गाईडलाईन्स)पाळण्यात येणार आहेत हे या पत्रात मांडण्यात आले आहे. याशिवाय या पत्रात मुख्यमंत्री यांच्यासोबत या सर्व गोष्टींबद्दलची चर्चा करण्याबाबत  व्हर्च्युअल मीटिंग करण्याची इच्छा असल्याचेही यात सांगितले आहे. अशोक पंडित यांनी हे पत्र त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. 

एफडब्ल्यूसीईने लिहिलेल्या पत्रानुसार, त्याच्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही क्षेत्राच्या एकूण 32 वेगवेगळ्या संस्था जोडलेल्या आहेत. यामध्ये 5 लाख सदस्यांचा आणि तंत्रज्ञचा समवेश आहे. लॉकडाउननंतरच्या वातावरणात चित्रीकरण सुरू केल्यानंतर कामगार आणि सर्व तंत्रज्ञ कामावर पुन्हा रुजू होण्यापूर्वी त्याच्या सुरक्षेची कशाप्रकारे काळजी घेतली जाईल हे यामध्ये सांगण्यात आले आहे. 

एफडब्ल्यूसीईच्या या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आले आहे की, सेटवर चित्रीकरण सुरू करण्याआधी कास्ट आणि क्रुचे संपूर्ण वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य असणार आहे, कास्ट आणि क्रु व्यतिरिक्त बाहेरील कोणतीही व्यक्ती सेटवर उपस्थित नसेल, सेटवर सर्वांसाठी सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्हज उपलब्ध असणे गरजेचे, निर्मात्यांनी संपूर्ण क्रुला पौष्टीक जेवणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. याशिवाय या गाईडलाईन्समध्ये निर्मात्यांना सेटवर कमी कर्मचार्‍यांसोबत काम करावे लागणार आहे. कोणीही बेरोजगार होऊ नये म्हणून त्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवावे लागेल असेही सांगण्यात आले आहे.

याशिवाय सेटवर एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्यास निर्माते त्या कर्मचार्‍याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत करतील तसेच वाहिनी आणि निर्मात्यांना कामगाराच्या वैद्यकीय खर्चाचीही काळजी घ्यावी लागणार आहे, असे अनेक नियम या पत्रात मांडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT