fighter movie deepika padukon hrithik roshan first look viral released on 26 january 2024 eSakal
मनोरंजन

Fighter Movie: दीपिका - हृतिकचा फायटर मधील पहिला लूक समोर, तुम्हाला कसा वाटला?

फायटरमधील दीपिका - हृतिकचा पहिला लूक समोर आलाय

Devendra Jadhav

Fighter Movie Updates News: गेल्या काही महिन्यांपासुन दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन यांच्या फायटर सिनेमाची उत्सुकता आहे. 'पठाण'नंतर सिद्धार्थ आनंद या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

अशातच फायटर सिनेमातील हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा फर्स्ट लूक समोर आलाय. दीपिका - हृतिक तडफदार ऑफीसरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

(fighter movie deepika padukon hrithik roshan first look viral)

फायटरमधील हृतिक - दीपिकाचा फर्स्ट लूक

हृतिक रोशनचा सिनेमातील फर्स्ट लूक समोर आलाय. Squadron Leader शमशेर पठानिया उर्फ पॅटी असं हृतिकचं नाव असणार आहे. हृतिक एकदम डॅशिंग अंदाजात दिसतोय.

तर नुकतंच फायटरमधील दीपिका पदुकोणचा लूक समोर आलाय. Squadron Leader मीनल राठोड उर्फ मिनी असं तिचं नाव असुन तिने डोळ्यांवर गॉगल चढवला आहे. दीपिकाच्या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

फायटरमध्ये अनिल कपूर यांचा वेगळा अंदाज

फायटरमधील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर देखील एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर देखील अनिल कपूर यांनी आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.यापूर्वी त्यांच्या द नाईट मॅनेजर नावाच्या वेबसीरिजला प्रेक्षकांनी पसंत केले होते. त्यातील त्यांची आणि प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलीपालाच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली होती.

फायटर सिनेमाची रिलीज डेट

फायटर सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २६ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाण सिनेमा २०२३ ला प्रजासत्ताक दिनाला रिलीज झाला होता. पठाणने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. त्यामुळे आता सिद्धार्थचा फायटर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

(Fighter movie release date)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

Satara: धक्कादायक! 'मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार'; फलटण तालुक्यातील प्रकार, विवस्त्र फोटो पोस्ट अन्..

NCERT New History Book: बाबर क्रूर विजेता तर औरंगजेब हा मंदिरे तोडणारा; ‘एनसीईआरटी’च्या आठवीच्या नव्या पुस्तकातील माहिती

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा खमंग 'गोड ढोकळा', सोपी आहे रेसिपी

Satara News:'महाबळेश्वरात अतिक्रमण हटविताना गोंधळ'; शासकीय कामात अडथळा, आठ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

SCROLL FOR NEXT