Film producer Boney Kapoor's credit card misused, loses Rs 3.82 lakh in cyber fraud Google
मनोरंजन

बोनी कपूर यांच्यासोबत कसा झाला cyber fraud? कोणी उडवले पैसे,कसे केले खर्च?

बोनी यांच्या खात्यातून ९ फेब्रुवारीला सायबर चोरट्यांनी पाच व्यवहार करून त्याद्वारे तीन लाख ८२ हजार रुपये हस्तांतरित केले आहेत

प्रणाली मोरे

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचे(Janhavi Kapoor) वडील बोनी कपूर (Boney Kapoor) सोबत सायबर गुन्हा(Cyber Fraud) घडला आहे. त्यांच्या अकाऊंटमधून तब्बल ४ लाख रुपये चोरी झाले आहेत. याची खबर लागताच बोनी कपूर यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) यासंदर्भात तक्रार केली आहे. सध्या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पण अद्याप आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

माध्यमांना मिळालेल्या बातमीनुसार,बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डमधून पाच वेळा ट्रान्झॅक्शन झालं होतं आणि अकाऊंटमधून तब्बल ३.८२ लाख रुपये गायब झाले होते. पण हे सगळं घडण्याआधी बोनी कपूर यांना ना कुणाचा फोन आला होता,ना कोणाशी त्यांनी क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती शेअर केली होती. बोनी कपूर यांना याविषयी तेव्हा माहिती झालं जेव्हा बॅंकेतील अधिकाऱ्यांनी क्रेडिट कार्डचं बील भरण्यासाठी फोन केला. सध्या,बोनी कपूर यांनी बॅंकेशी बातचीत केल्यानंतर अंबोली पोलिस स्टेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं आहे की बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करताना संपूर्ण डेटा काढला गेला आहे. ही देखील माहिती पोलिसांना मिळाली आहे की बोनी कपूर यांच्या अकाऊंटमधून जे पैसे काढले गेले आहेत,ते गुडगावच्या अकाऊंटला ट्रान्स्फर झाले आहेत. जे अकाउंट एका कंपनीचं आहे असं प्रथम चौकशीत समोर आलं आहे. सध्या या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आणि पोलिस चोराला लवकरात लवकर पकडण्यासाठी पूर्ण कसोशीनं प्रयत्न करत आहेत.

बोनी कपूर एक प्रसिद्ध निर्माता आहेत. त्यांनी 'मिस्टर इंडिया','नो एन्ट्री','जुदाई','वॉन्टेड' सारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यासोबतच ते कॉलीवूड मध्येही सिनेमांची निर्मिती करतात. त्यांचं पहिलं लग्न निर्मात्या मोना शौरीसोबत झालं होतं,त्या लग्नापासून त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं आहेत. त्यांनतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी सोबत लग्न केलं. आणि त्या लग्नापासून जान्हवी आणि खूशी कपूर या दोन मुली त्यांना आहेत. आता बोनी कपूर आपल्या चारही मुलांसोबत आनंदाचे क्षण शेअर करताना कायम दिसत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT