godavari, jitendra joshi, dharmaveer, me vasantrao, filmfare awards marathi 2022, godavari full movie
godavari, jitendra joshi, dharmaveer, me vasantrao, filmfare awards marathi 2022, godavari full movie SAKAL
मनोरंजन

Filmfare Awards Marathi 2022: फिल्मफेयर अवॉर्ड्स मध्ये या मराठी सिनेमाने मारली बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

Devendra Jadhav

Filmfare Awards Marathi 2022 News: काल फिल्मफेयर अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकार ग्लॅमरस अंदाजात उपस्थित होते. फिल्मफेयर अवॉर्ड्स मध्ये अनेक मराठी कलाकार पुरस्काराची प्रतीक्षा करत असतात.

आपल्या कलाकाराला आणि सिनेमाला ब्लॅक लेडी मिळावी म्हणून सगळे कलाकार उत्सुक असतात. अखेर फिल्मफेयर पुरस्कारांची घोषणा झालीय.

(filmfare awards marathi 2022 best film awards goes to godavari)

फिल्मफेयर अवॉर्ड्स मध्ये गोदावरी सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरलाय. याशिवाय या सिनेमाने फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन, सर्वोत्कृष्ट पटकथा निखिल महाजन, प्राजक्त देशमुख,

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि अभिनेता जितेंद्र जोशीला बेस्ट क्रिटिक्स अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालाय. अशाप्रकारे फिल्मफेयर अवॉर्ड्स मध्ये गोदावरी सिनेमाने बाजी मारली आहे.

काल ३० मार्चला कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत फिल्मफेयर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री म्हणून हृता दुर्गुळे हिला अनन्या साठी पुरस्कार मिळाला.

मी वसंतराव सिनेमासाठी अनिता दाते हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तर राहुल देशपांडेंना कैवल्यगान सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार मिळाला.

चंद्रमुखी सिनेमासाठी आर्या आंबेकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री, अजय - अतुलला सर्वोत्कृष्ट संगीत, चंद्रा साठी दीपाली विचारे यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

बालभारती सिनेमातील आर्यन मेघनजी याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. वेड सिनेमातील खुशी हजारेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून फिल्मफेयर मिळाला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT