filmfare winning Director Trushant Ingle announce his new marathi movie Ulgulan sakal
मनोरंजन

Ulgulan movie: फिल्मफेयर पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाची मोठी घोषणा.. झाडीपट्टी नंतर आता..

दिग्दर्शक तृशांत इंगळेच्या नवीन सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा..

नीलेश अडसूळ

ulgulan marathi movie: गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या तृशांत इंगळे दिग्दर्शित "झॉलीवूड" या चित्रपटातून झाडीपट्टी रंगभूमीची चांगलीच चर्चा रंगली होती.

चित्रपटाचे दिग्दर्शन, तांत्रिक बाजू, अभिनय अशा अनेक कारणांमुळे ह्या चित्रपटाला चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची कौतुकाची थाप मिळवली होती. देश विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात सुद्धा ह्या चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

चित्रपट क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्म फेअर पुरस्कार "झॉलीवूड" चित्रपटासाठी तृषांत इंगळेंला मिळाला आणि पुन्हा एकदा चित्रपटाची गुणवत्ता सिद्ध झाली. नुकतीच त्याने एक मोठी घोषणा केली आहे.

(filmfare winning Director Trushant Ingle announce his new marathi movie Ulgulan)

गेल्या वर्षी ५ जूनला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या "झॉलीवुड" या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतेच एक वर्ष झाले आणि याच विशेष दिवसाला तृषांत इंगळेंनी आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली ज्याच नाव आहे "उलगुलान".

तृषांत इंगळे म्हणाला "उलगुलान" चा अर्थ क्रांती असून हा चित्रपट भारतातल्या आदिवासी समाजावरती भाष्य करणारा आहे. या चित्रपटात महाराष्ट्रातील दिग्गज अभिनेते ह्या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. नागपूर विदर्भातील सुद्धा कलावंत नक्कीच झळकतील. चित्रपटाचे लेखन पटकथा लेखन पूर्ण झाले असून निर्मितीसाठी ऑगस्ट पासून सज्ज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT