filmmaker santosh gupta wife asmita and daughter srishti allegedly die by suicide after setting themselves  
मनोरंजन

बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्याच्या पत्नी, मुलीचा जळून मृत्यु; आत्महत्येचा संशय 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूड जगतातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता गुप्ता आणि मुलगी सृष्टी गुप्ता या दोघींचा जळून मृत्यु झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना धक्कादायक असून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमवारी ही घटना घ़डली आहे. शेजारच्यांनी जेव्हा आग लागल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी तातडीनं फायर ब्रिगेडला कळवलं. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आता आई आणि मुलीच्या मृत्युबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी आई आणि मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यावेळी त्यांचा मृत्यु झाला. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार त्या दोघींनाही उपचारासाठी रुग्णालयात केले होते. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी आईचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषित केले होते. त्या 70 टक्के भाजल्या होत्या. मुलगी सृष्टीला आता नॅशनल बर्न सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संतोष यांची पत्नी किडनीच्या एका आजारानं त्रस्त झाली होती. त्यावेळेपासून ती मोठ्या वेदनांना सामोरं जात होती. मुलीला आईच्या त्या वेदना पाहवल्या जात नव्हत्या. त्यामुळे यापुढे त्या दोघींनीही आयुष्य संपवण्याचा निर्धार केल्याची चर्चा आहे. यासाठी आत्महत्येचा विचार केला असे एक कारण प्राथमिक तपासातून समोर आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना डीएन नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भारत गायकवाड म्हणाले, दोन वेगवेगळ्या मृत्युच्या तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT