mani ratnam 
मनोरंजन

शूटिंगदरम्यान घोड्याचा मृत्यू; मणी रत्नम यांच्याविरोधात गुन्हा दाखल

चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका

स्वाती वेमूल

दिग्दर्शक मणी रत्नम Mani Ratnam आणि त्यांची टीम गेल्या काही महिन्यांपासून पोन्नीयन सेल्वानच्या Ponniyin Selvan शूटिंगमध्ये व्यग्र आहे. युद्धकालीन कथेवर चित्रपट आधारित असल्याने निर्मात्यांनी शूटिंगदरम्यान घोड्यांचा वापर केला आहे. शूटिंग करत असताना एका घोड्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी PETA ने (People for Ethical Treatment of Animals) तक्रार दाखल केली असून त्यानंतर अब्दुल्लापुरमेट पोलिसांनी एफआयआर दाखल केली. मद्रास टॉकीजचे व्यवस्थापन (मणी रत्नम यांचं प्रॉडक्शन हाऊस) आणि घोड्याचे मालक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या एफआयआरनंतर पशु कल्याण मंडळाने मणी रत्नम यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

पोन्नीयन सेल्वान या चित्रपटाचं शूटिंग सध्या मध्य प्रदेशात सुरू आहे. ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, त्रिशा, जयम रवी, कार्ती आणि प्रकाश राज हे कलाकार सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना संबंधित दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. हैदराबादमध्ये पोन्नीयन सेल्वानच्या शूटिंगदरम्यान एका घोड्याचा मृत्यू झाला. पेटा इंडियाला याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी तक्रार दाखल केली. अब्दुल्लापुरमेट पोलिसांनी कलम ११, पीसीए कायदा, १९६० आणि भारतीय दंड संहितेचा, १८६० च्या कलम 429 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

PETA इंडियाच्या मुख्य वकिली अधिकारी खुशबू गुप्ता तक्रारीत म्हणाल्या, "कम्युटर जनरेटेड इमेजरीच्या (CGI) युगात निर्मात्यांनी थकलेल्या घोड्यांना युद्धाच्या सीनसाठी धावायला भाग पाडण्याचे काही कारण नाही." संबंधित घोड्याच्या मालकाने पोन्नीयन सेल्वानच्या निर्मात्यांना थकलेले घोडे शूटिंगसाठी दिले होते, अशी माहिती समोर येत आहे. एफआयआरनंतर भारतीय पशु कल्याण मंडळाने हैदराबादचे जिल्हाधिकारी आणि तेलंगणा राज्य पशु कल्याण मंडळ यांना घोड्याच्या मृत्यूबद्दल चौकशीसाठी बोलावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

Latest Marathi News Live Update : नाशिक-चांदवड पुलाचा भराव गेला वाहून, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

SCROLL FOR NEXT