Shweta Tiwari Google
मनोरंजन

श्वेता तिवारीच्या अडचणी वाढल्या;अखेर एफआयआर दाखल

वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी(Shweta Tiwari) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेत्रीने देवाविषयी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. आता अभिनेत्रीच्या अडचणीत आणखी वाढ झालेली दिसून येत आहे. श्वेता तिवारीने केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 'मेरी ब्रा का साईज भगवान ले रहे है..' या श्वेताच्या विधानामुळे उठलेला वाद तिला पोलिस ठाणं आणि कोर्टाच्या वाऱ्या करायला लावतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. भोपाळच्या श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेताविरोधात कलम २९५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजचे प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या प्रमोशनकरीता हॉटेल जाहान नूमा पॅलेसमध्ये गेली होती. त्यावेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेताने 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. श्वेता तिवारीचे हे वक्तव्य समोर येताच हिंदू संघटनांनी अभिनेत्रीचा कडाडून विरोध केला तर राजकीय गोटातूनही याचे पडसाद उमटताना दिसून आले. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. श्वेता तिवारीने जाहीर माफी मागावी,अन्यथा तिच्या वेबसिरीजचं शुटिंग भोपाळमध्ये होऊ देणार नाही असा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे. आता एफआयआर दाखल झाल्यानंतर श्वेता यावर काय स्पष्टीकरण देतेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT