Gauri Khan  Esakal
मनोरंजन

Gauri Khan : शाहरुख खानची बायको अडचणीत! गौरी खानविरुद्ध FIR दाखल

काय आहे प्रकरण जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील एक व्यक्ती जसवंत शाह यांनी तुलसियांनी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेड लखनऊमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्याची किंमत कोट्यवधीत होती. त्यापैकी आतापर्यंत 86 लाख रुपये त्यांनी दिले आहेत. तरीही त्याला फ्लॅट मिळाला नाही, असा दावा जसवंत शाह यांनी केला आहे.

या कारणास्तव गौरी खान विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कारण गौरी खान या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळेच त्यांनी गौरी खान विरोधात हा एफआयआर दाखल केला आहे.

जसवंत शाह यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार तुलसियांनी आणि संचालक महेश तुलसियानी यांच्या विरोधातही एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी तिघांवरही कलम 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. गौरी खान ही तुलसियांनी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पर्स लिमिटेडची ब्रँड अॅम्बेसेडर होती. तिच्याकडून झालेला प्रचार आणि प्रसार पाहून प्रभावित होऊन हा फ्लॅट त्यांनी खरेदी केला होता. मात्र, आपली फसवणूक झाली असल्याचं असं शाह यांनी सांगितलं आहे.

संबधित प्रकरणावर गौरी खानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पैसै देऊनही मला फ्लॅट देण्यात आला नाही, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे. कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने गौरीचं या प्रकरणात नाव आलं आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT