abhishek bachchan 
मनोरंजन

अभिषेक बच्चन डिजीटल पदार्पणासाठी सज्ज, वेबसिरीजचा फर्स्ट लूक आला समोर..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- ज्युनिअर बच्चन आता डिजीटल पदार्पणासाठी सज्ज झालाय. नुकताच त्याच्या आगामी ब्रीदः इन टू द शॅडोजचा फर्स्ट लूक रिलीज केला गेला आहे. ही क्राईम थ्रीलर वेबसिरीज अबुंदंतिया एंटरटेन्मेंटद्वारा निर्मित केली गेली आहे. या वेबसिरीजमधून अभिषेक बच्चन डिजीटल पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. या सिरीजमध्ये अमित साध पुन्हा एकदा सिनिअर इंस्पेक्टर कबीर सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. 

ही वेबसिरीज १० जुलै २०२० ला रिलीज केली जाणार आहे. ही वेबसिरीज जगभरातील २०० पेक्षा अधिक देशांमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ऍमेझॉन प्राईमवर लॉन्च केलं जाणार आहे. या वेबसिरीजमधील अभिषेक बच्चनचा लूक एक गडद आणि हेतूपूर्वक प्रतिमा दर्शवणारा दिसून येतोय. या पोस्टरवरील अभिषेकचा लूक एकदम गंभीर असा दिसून येतोय.

एका हरवलेल्या मुलाच्या पोस्टरकडे गंभीर नजर टाकताना अभिषेक दिसतोय. अभिषेकचा हा लूक अतिशय रहस्यपूर्ण आणि प्रभावशाली दिसतोय. त्याच्या या लूकची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. या वेबसिरीजच्या फर्स्ट लूकवर अभिषेकने त्याची प्रतिक्रिया देखील शेअर केली आहे.

अभिषेकने म्हटलंय, ब्रीदः इन टू द शॅडोज सोबत माझं डिजीटल विश्वात पदार्पण करण्याचा अनुभव खूपंच छान आहे. गेल्या शुक्रवारी या वेबसिरीजची घोषणा केल्यापासून माझी उत्सुकता आणखीनंच वाढली आहे. शोच्या लॉन्चच्या तारखेची घोषणा झाल्यापासून मला जे प्रेम आणि समर्थन मिळालंय त्यामुळे नवीन प्रेक्षकांसोबत जोडला जाण्याचा माझा विश्वास आणखी दुप्पट झाला आहे. मी माझी पहिली डिजीटल सिरीज सुरु करत असल्याने खूपंच आनंदी आहे. 

अभिषेक बच्चन स्टारर ब्रीदः इन टू द शॅडो या वेबसिरीजचं दिग्दर्शन मयंक शर्मा यांनी केलं आहे. मयंक शर्मा यांनी भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयदसोबत मिळून ही सिरीज लिहिली आहे. या सिरीजचा ट्रेलर १ जुलैला लॉन्च होणार असून १० जुलैला ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर याचं स्ट्रीमिंग होईल.

first look of abhishek bachchans digital debut breath in to the shadow 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT