first Marathi movie based on zombies zombivalicha teaser release on social media 
मनोरंजन

मराठीतला पहिला झोम्बीपट; अमेय वाघच्या 'झोंबिवलीचा' टीझर व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - हॉलीवूडमध्ये झोम्बीपटांची काही कमी नाही. वेगळ्या धाटणीच्या या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्याला मिळणारी पसंतीही सर्वाधिक आहे. आतापर्यत हॉलीवूडमध्ये जे झोम्बीपट तयार झाले त्यांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे. मराठीतही आता पहिला झोम्बीपट येणार आहे. 'झोंबिवली' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. त्याच्या टीझरवर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडत आहे.

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा बहुचर्चित 'झोंबिवली' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांनी यापूर्वी फास्टर फेणे, क्लासमेट्स, माऊली यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.  काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर लाँच झाले होते. आता त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 30 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण केले.  सध्याच्या घडीला झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट आहे जो चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे.

झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. याविषयी अधिक माहिती देताना बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले, मराठी मध्ये हॉरर- कॉमेडी सिनेमे तसे खूप कमी आहेत.  झोंबीवर आधारित हा पहिलाच सिनेमा असेल. चित्रपटाची गोष्टसुद्धा खूप वेगळी आहे. गेल्या वर्षी आम्ही चित्रपटाचे पोस्टर लाँच केले, तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता या टीझरमुळे चाहत्यांना झोंबिवलीच्या जगाची झलक पाहायला मिळणार आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीज होईल व प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल अशी आशा आहे.

मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे. टीझरमध्ये प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे. यात अमेय, ललित आणि वैदेही हे कलाकार आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT