Bigg Boss Marathi 3 file
मनोरंजन

'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार असं काही..

महेश मांजरेकर यांनी केली घोषणा

स्वाती वेमूल

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन (Bigg Boss Marathi 3) अंतिम टप्प्यात आलं असून येत्या २६ डिसेंबर रोजी ग्रँड फिनाले पार पडणार आहे. रविवारी सोनाली पाटील घराबाहेर पडल्यानंतर सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक आहेत. रविवारच्या चावडी स्पेशल एपिसोडमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मोठी घोषणा केली. बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच आठवड्याच्या मधील दिवसांत स्पर्धकाचं एलिमिनेशन होणार आहे.

विशाल निकमने आधीच 'तिकिट टू फिनाले' जिंकलं आहे. त्यामुळे ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणारा तो पहिला स्पर्धक ठरला आहे. त्याच्याशिवाय उरलेले पाच स्पर्धक हे नॉमिनेट झाले आहेत. विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, मीनल शाह आणि जय दुधाणे यांच्यापैकी एकाला या आठवड्यात घराबाहेर पडावं लागणार आहे. येत्या २३ डिसेंबर रोजी हे एलिमिनेशन पार पडणार आहे.

सोनाली पाटीलचं एलिमिनेशन

यंदाच्या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धक सोनाली पाटील (Sonali Patil) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. जवळपास ९० हून अधिक दिवस सोनाली बिग बॉसच्या घरात होती आणि ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणाऱ्या स्पर्धकांमध्ये तिचं नाव आवर्जून असेल असं अनेकांना वाटलं होतं. सोनालीच्या एलिमिनेशनमुळे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांना सुद्धा धक्का बसला. या सीझनमधील हे सर्वात धक्कादायक एलिमिनेशन असल्याचं मत मांजरेकर यांनी मांडलं.

सोनालीने बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच आपली वेगळी छाप सोडली होती. सोशल मीडियावर तिची नेहमी चर्चा असायची. कोल्हापुरी लहेजा आणि अफलातून नृत्य कौशल्य यांनी तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. विशाल निकम आणि विकास पाटील यांच्यासोबतची तिची मैत्री आणि वाद नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT