Former CBFC chief Pahlaj Nihalani backs Vishal, takes a dig at Prasoon Joshi on corruption charges  SAKAL
मनोरंजन

Actor Vishal: "प्रसून जोशीने राजीनामा द्यावा", लाचखोरीच्या आरोपानंतर पहलाज निहलानींची टिका

साऊथ अभिनेता विशालने मुंबई सेन्सॉर बोर्डावर लाच घेतल्याचे गंभीर आरोप केले आहेत

Devendra Jadhav

Actor Vishal News: साऊथ अभिनेता विशालने काल मुंबई सेन्सॉर बोर्डाने लाच मागितल्याची गोष्ट उघडकीस आणुन एकच खळबळ उडवून दिली. विशालने मुंबई सेन्सॉर बोर्डाने सहा लाखांपेक्षा जास्त रकमेची लाच मागितल्याचा गंभीर आरोप विशालने केला.

या सर्व प्रकरणावर मनोरंजन विश्वातून आणि इतर सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानींनी टिका करत सध्याचे अध्यक्ष प्रसून जोशींनी राजीनामा देण्याची मागणी केलीय.

अत्यंत लाजीरवाणी बाब, प्रसून जोशीने तत्काळ राजीनामा द्यावा: पहलाज निहलानी

CBFC चे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी म्हणाले, ' सिनेमा उद्योगाच्या हितासाठी प्रसून जोशी यांनी राजीनामा द्यावा, असे माझे मत आहे. जर तो वेळ देऊ शकत नसेल तर त्याला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तो अध्यक्षांच्या कार्यालयातही बसत नाहीत आणि त्यांनी सर्व अधिकार सीओला दिले आहेत. मंजुरीचे काम अध्यक्ष करतात, मात्र हे काम सध्या सीओ करत आहेत. सीओचे काम फक्त प्रशासनावर लक्ष ठेवणे आहे. सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात जे घडत आहे ते अत्यंत लाजिरवाणे आहे,''

या निमित्ताने अनेक निर्माते - दिग्दर्शक त्यांची व्यथा मांडतील: निहलानी

पहलाज निहलानी पुढे म्हणतात, ''मी तुम्हाला सांगतो की, भ्रष्टाचाराचा हा ट्रेंड बऱ्याच काळापासून सुरू आहे. मला अनेक निर्मात्यांचे मेसेज येतात, ते म्हणतात की, ‘साहेब तुम्ही असता तर आम्हाला काही अडचण आली नसती, पण आता पैशाशिवाय काहीही होत नाही’. लोकं चित्रपटही बघत नाहीत. या तक्रारींनंतर मी सीबीएफसीच्या संबंधित सदस्याला या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेण्यास सांगितले. माझा एक ओळखीचा माणूस आहे ज्याने कन्नड चित्रपट बनवला होता. त्याच्या सिनेमाला हिंदी डबच्या प्रमाणपत्रासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. नंतर पैसे मिळाल्यावर त्यांच्या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले. भ्रष्टाचार इथे उघडपणे होत आहे. आता या निमित्ताने अनेक निर्माते आणि दिग्दर्शक पुढे येऊन त्यांची व्यथा मांडतील,"

विशालने केला लाच मागितल्याचा आरोप

तमिळ अभिनेता आणि निर्माता विशालने त्याचा आगामी चित्रपट ‘मार्क अँटनी’ चे हिंदी व्हर्जन भारतात प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने 6.5 लाखाची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. ह्या माहितीचा व्हिडीओ त्याने काल सोशल मीडियावर टाकताच, तो व्हिडीओ वायरल झाला आणि आज सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष देण्याचे आवाहन केलेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT