मुंबई - बॉलीवूडमध्ये bollywood गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या धक्कादायक घडामोडी समोर येताना दिसत आहे. त्यापैकी एक म्हणजे आता माजी मिस इंडिया युनिव्हर्सवर miss india universe तिच्या सासरच्यांनीच अश्लील व्हिडिओ बनवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या बातमीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये देखील खळबळ उडाली आहे. हे प्रकरण प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राशी संबंधित असल्याचेही बोलले जात आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती असलेला राज सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर अश्लील व्हिडिओ बनवणे आणि ते शेयर करणे असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यावरुन शिल्पालाही ट्रोल करण्यात आले आहे.
यापूर्वी देखील काही अभिनेत्रींनी राजवर वेगवेगळे आरोप केले होते. त्यामुळे त्याची डोकेदुखी वाढत चालल्याचे दिसून आले आहे. आता जी माहिती समोर येत आहे त्यातून एका माजी मिस इंडियावर तिच्या सासरच्या लोकांनी गंभीर आरोप केला आहे. त्या मिस इंडियाचे नाव प्रियंका पासवान असे असून तिच्या सासरच्यांनी तिच्यावर अश्लील व्हिडिओ तयार करण्याचा आरोप केला आहे. तिच्या सासरच्या मंडळींचं असं म्हणणं आहे की, प्रियंकानं काही अश्लील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याची माहिती सासरच्या लोकांना मिळाली. आणि तिच्याविरोधात तक्रार करण्याचा निर्णयही घेतला आहे.
प्रियंकानं आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे. आपल्याविरोधात सासरच्यांनी कट केला असल्याचे सांगितलं आहे. एक खोटी कहाणी सांगून आपल्याविरोधात वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या जात असल्याचे प्रियंकांन सांगितलं आहे. प्रियंकानं आता सासरच्या मंडळींविरोधात तक्रार केली आहे. ज्यांनी मला बदनाम केलं आहे त्यांच्याविरोधात आपण पोलिसांकडे जाणार असल्याचेही तिनं सांगितलं आहे. प्रियंकानं २०१९ मध्ये मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. तिची ओळख नीरज कुमार यांच्याशी झाली. आणि त्यांनी २०२१ मध्ये लग्न केलं. आता त्या दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.