Imran Khan esakal
मनोरंजन

Imran Khan : पाकचे माजी PM इम्रान खान बॉलीवूडच्या दोन अभिनेत्रीच्या होते प्रेमात! लग्नही ठरलं, पण...

इम्रान खान यांच्या अफेयरच्या चर्चा या नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आल्या आहे.

सकाळ डिजिटल टीम

Former Pakistan Prime Minister Imran Khan Love Story Bollywood Actress : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इम्रान खान हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. सध्या सोशल मीडियावर ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. इम्रान खान हे त्यांच्या रोमँटिक अंदाजासाठी देखील प्रसिद्ध होते. सध्या त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींवर इम्रान खान यांचे विशेष लक्ष होते. त्यात एका अभिनेत्रीनं मात्र त्यांच्या मनात घर केलं. आणि त्या नात्याची माध्यमांना जेव्हा भणक लागली तेव्हा त्यांनी त्याला मीठमसाला लावून बातम्या देण्यास सुरुवात केली. बॉलीवूडची ती प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि पाकिस्तानचे इम्रान खान यांचे नाव तेव्हा लाईमलाईटमध्ये आली. ते कमालीचे लोकप्रिय झाले होते.

Also Read : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

इम्रान खान यांच्या अफेयरच्या चर्चा या नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आल्या आहे. यापूर्वी देखील त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान जेव्हा भारतात आले तेव्हा ते प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमानच्या प्रेमात पडले. क्रिकेटर झाल्यानंतर ते जेव्हा भारताच्या दौऱ्यावर होते तेव्हा भारतीय माध्यमांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. जिकडे तिकडे इम्रान यांच्याच नावाची चर्चा होती.

एका पार्टीमध्ये इम्रान यांची जीनत अमान यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली. हे दोघेजण लंडनमध्ये एकमेकांना भेटत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. असंही म्हटलं जातं की, इम्रान खान यांना जीनत अमान यांच्याशी लग्न कऱण्याची इच्छा होती. मात्र त्यांना भारत सोडायचे नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाली. यानंतर इम्रान यांचे नाव बेनजीर भुट्टो यांच्याशी देखील जोडले गेले होते.

बेनजीर भुट्टो यांच्या नावाचा उल्लेख ऑटोबायोग्राफी मध्ये देखील करण्यात आला आहे. असंही म्हटलं जातं की, बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखासोबत त्यांचं नातं अधिक गहिरं होतं. ते लग्नही करणार होते. द स्टारमध्ये आलेल्या त्या वृत्तानुसार, रेखाला त्यांच्या आईनं त्या लग्नाला परवानगी दिली होती. त्यावेळी रेखा यांच्यासाठी मुंबईमध्ये एक महिना इम्रान खान राहिले होते. मात्र काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही. इम्रान यांनी ते नातं सोडलं ते कायमचचं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT