Kajol,Veena Devgan Google
मनोरंजन

असं नेमकं काय घडलं की काजोलचं सासूप्रेम गेलं ऊतू?

सोशल मीडियावरनं शेअर केली एक भावूक पोस्ट...

प्रणाली मोरे

उत्तम अभिनयाच्या जोरावर काजालने(Kajol) अख्खं बॉलीवूड गाजवलंय. आताच्या हरहुन्नरी कलाकारांच्या यादीत सामिल असलेल्या आलिया भट्टने तर करण जोहरच्या शोमध्ये काजोलच्या अभिनयाची मी फॅन आहे अशी जाहीर कबुली दिलीय. काजोल म्हणजे अभिनयाचा निखळ झरा. तिच्या प्रत्येक भूमिकेतनं तिने ते सिद्ध केलंय. तिचे ब-यापैकी सिनेमे बॉक्सऑफिसवर कमाई करायचे आणि जरी एखादा चालला नाही तरी त्यातील काजोलच्या अभिनयाचे मात्र खूप कौतूक केले जायचे. केवळ प्रेक्षक नाही तर क्रिटिक्सही तिची तारीफ करताना थकायचे नाहीत. आता काजोलने हे सगळं मॅनेज केलं म्हणून झालं असेल तर तसंही नाही बरं का. कारण पडद्यावर नेहमी हॅपी गो लकी,चुलबूली भुमिका करणारी काजोल प्रत्यक्षात मात्र खूप मुडी,पटकन कोणाशी कनेक्ट नं होणारी अशा स्वभावाची आहे. आता हा स्वभाव तिचा घरात आणि बाहेर दोन्हीकडे ती कॅरी करते. हे स्वतः काजोलनेच सांगितले आहे. तिच्या या स्वभावामुळे वीणा देवगण ज्या तिच्या सासू आहेत त्यांच्यासोबतच्या नात्यातही काही वर्ष धुसफूस होती असंही तिनं एकदा कबल केलं होतं.

स्वतः काजोलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत सासू सोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा केलाय. ती त्या पोस्टमध्ये म्हणतेय,''मी माझ्या सासूबाई वीणा देवगण यांना लग्नानंतरही अनेक वर्ष 'मम्मीजी','मॉं' अशी हाक मारत नव्हते. मी त्यांना लग्नाआधीपासून 'आंटी' म्हणत होते त्यामुळे लग्नानंतरही तशीच हाक मारायला गेले. त्यांनीही मला 'मम्मी' किंवा 'मॉं' म्हणण्याची जबरदस्ती केली नाही. एकदा माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या तेव्हा मी ही तिथे होते. आणि मी त्यांना 'आंटी' हाक मारल्यावर त्या सगळ्या एकदम त्यांना म्हणाल्या,'अजून ही तुला मम्मी किंवा मॉं वगैरे हाक मारत नाही'. तेव्हा माझ्या सासूबाई पटकन त्यांना म्हणाल्या,''ती जेव्हापण मला 'मम्मी' किंवा 'मॉं' म्हणेल ते मनापासून असेल केवळ डोक्यात ठेवून म्हणायचं म्हणून हाक मारणार नाही. आणि मी त्या क्षणाची वाट पाहीन. ते ऐकलं आणि मी माझ्या सासूच्या एकदम प्रेमात पडले. त्यांच्याविषयीचा माझ्या मनातला आदर,प्रेम अधिक वाढला. आणि त्या दिवसानंतर मी त्यांना 'मम्मीजी' अशी हाक मारू लागले. आंटी ते मम्मीपर्यंतचा प्रवास असा घडून आला म्हणून कदाचित आज आमच्यात एक घट्ट नातं आहे.

काजोल आणि तिच्या सासूमध्ये आज खूप चांगलं नातं आहे. आपल्या सासूच्या वाढदिवसाला तिने शुभेच्छा दिल्या होत्या की,''Happy birthday to my partner in crime and crab for the last 22 years. Aapki hansi kabhi kam na ho (May you always continue to smile). #motherbylaw #mominspirit,” असं तिने लिहिलं होतं. अजय देवगण आणि काजोलने २४ फेब्रुवारी १९९९ला लग्न केलं होतं. त्यांना न्यासा नावाची मुलगी आणि युग नावाचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT