free autoriksha tour and free movie ticket for who watching the kerala stroy film alandi riksha driver viral photo sakal
मनोरंजन

The Kerala Story पाहाणाऱ्याला मोफत प्रवास अन तिकीटही.. आळंदीच्या रिक्षावाला होतोय व्हायरल..

सध्या सर्वत्र चर्चा ती 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची..

नीलेश अडसूळ

The Kerala Story Director Vipul Amrutlal shah : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती विपुल अमृतलाल शाह यांच्या 'द केरल स्टोरी' या चित्रपटाची. विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मिर फाईल्स'नंतर हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत आलेला सिनेमा आहे.

लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयांवरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे.

परंतु काश्मीर फाइल्स प्रमाणेच या चित्रपटवरून दोन गट निर्माण झालेले दिसत आहेत. एक गट या चित्रपटाच्या समर्थनार्थ ठाम आहे तर दुसरा गट या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलंय ते आळंदी येथील रिक्षा चालकाने..

( free autorickshaw tour and free movie ticket for who watching the kerala stroy film alandi rickshaw driver viral photo)

पण पुण्यातल्या रिक्षा चालकाने मात्र या चित्रपटासाठी एक वेगळीच योजना केली आहे. चक्क या चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय या रीक्षा चालकाने घेतला आहे . तर आळंदी परिसरातील पहील्या दहा महिलांना ते मोफत चित्रपट दाखवणार आहेत. त्यामुळे आळंदीतील या रीक्षावाल्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे.

द केरळ स्टोरीचा ट्रेलर व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आले. यावरुन नेटकऱ्यांमध्ये मोठा वाद सुरू आहे. येत्या ५ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यावरून चांगलच वातावरण पेट घेत आहे. आता दोन दिवसात नेमकं काय घडणार, या चित्रपटाचे काय पडसाद उमटणार यावर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

विपुल शाह हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते असून त्यांनी यापूर्वी कमांडो, नमस्ते लंडन, नमस्ते इंग्लंड, एक्शन रिप्ले, ऑखे आणि वक्त सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे, त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT