FRIENDS Chandler Bing eSakal
मनोरंजन

Matthew Perry : इतरांना हसवणाऱ्या 'चँडलर'चं आयुष्य व्यसनामुळे झालं होतं उद्ध्वस्त; सोबर होण्यासाठी खर्च केले कोट्यवधी रुपये!

FRIENDS Chandler Bing : फ्रेंड्समधील सर्वात लोकप्रिय म्हणता येईल असं पात्र म्हणजे, 'चँडलर'.

Sudesh

नव्वदच्या दशकातील 'फ्रेंड्स' ही मालिका आजही जगभरात प्रसिद्ध आहे. यामधील पात्रं, घटना आणि डायलॉग्स अगदी आजच्या तरुणाईसाठी देखील चर्चेचा विषय आहेत. 'नाईन्टीज किड्स'साठी तर फ्रेंड्स म्हणजे एक खजिनाच आहे. फ्रेंड्समधील सर्वात लोकप्रिय म्हणता येईल असं पात्र म्हणजे, 'चँडलर'.

चँडलर बिंगची भूमिका साकारणाऱ्या मॅथ्यू पेरी या अभिनेत्याचं आज दुर्दैवी निधन झालं. आपल्या डायलॉग्समधून 'सार्काजम' लोकप्रिय करणारा, आणि कोट्या करण्यात पटाईत असणारा चँडलर बिंग हा सर्वच फ्रेंड्स फॅन्सचा फेव्हरेट होता. सर्वांना खळखळून हसवणाऱ्या मॅथ्यू यांना खऱ्या आयुष्यात मात्र कित्येक दुःखद आणि दुर्दैवी गोष्टींना तोंड द्याव लागलं होतं.

1969 साली जन्मलेल्या मॅथ्यू पेरीला अगदी लहान वयापासूनच व्यसन लागलं होतं. बियर, वाईन अशा गोष्टींपासून सुरू झालेलं व्यसन पुढे वाढत गेलं. त्यानंतर व्होडका, पेन किलर्स आणि हेरॉईन अशा अमली पदार्थांपर्यंत पोहोचलं होतं. पेरी यांनी एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे. तसंच, 'फ्रेंड्स, लव्हर्स अँड दि बिग टेरिबल थिंग' या आपल्या आत्मचरित्रात देखील त्यांनी याबाबत लिहिलं आहे. (ENT News)

मॅथ्यू सांगतात, "मला पेन किलर्सच्या गोळ्या खायचं देखील व्यसन लागलं होतं. मी दिवसाला सुमारे 55 गोळ्या खायचं टार्गेट ठेवायचो. जेव्हा तुम्ही एक व्यसनी असता, तेव्हा तुमच्या डोक्यात गणित पक्कं असतं. एखाद्या ठिकाणी मला किती वेळ लागेल त्यानुसार मी गोळ्या खायचो. कुठे तीन, कुठे पाच, कुठे आणखी जास्त. या गोळ्या मिळवण्यासाठी मी पाठदुखी, डोकेदुखीचं नाटक करायचो. तसंच, एका वेळी मी आठ वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात होतो."

"हेरॉइनवर पोहोचल्यानंतर मी ठरवलं की आता बास, यातून बाहेर पडायचं. त्यानंतर मी डॉक्टरांची मदत घेण्याचं ठरवलं. सोबर होण्यासाठी मी आतापर्यंत सुमारे 9 मिलियन डॉलर्स (सुमारे 74 कोटी रुपये) खर्च केले आहेत." असं मॅथ्यू यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्याची वेळ

2018 साली मॅथ्यू यांना तब्येतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. न्यूमोनिया, कोलोन इन्फेक्शन आणि इतर गोष्टींमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. ते या काळात दोन आठवडे कोमामध्ये देखील होते. तसंच त्यांच्या पोटावर बारापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

दारुच्या व्यसनामुळे त्यांना इरेक्टाईल-डिस्फंक्शनची समस्या देखील आली होती. तसंच, एका घटनेमध्ये बटर-टोस्ट खाताना त्यांचे वरचे दातच तुटून बाहेर आले होते. यावेळी खिशात दात घेऊन ते डेन्टिस्टकडे पळाले होते.

व्यसन म्हणजे नरक

इतर लोकांना व्यसनातून बाहेर येण्यासाठी मदत मिळावी यासाठीच त्यांनी आपल्या पुस्तकात याबाबत लिहिलं आहे. ते म्हणतात, "व्यसन म्हणजे एक नरक आहे. तुम्हाला कोणी दुसरं काही सांगत असेल तर ते ऐकू नका. मी हे सगळं करून बसलो आहे, त्यामुळे मी सांगू शकतो की हे नरक आहे." एवढ्या सगळ्या समस्यांवर मात करुन, सोबर होण्यापर्यंतचा पेरी यांचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : स्कॉटलंडच्या समावेशानंतर वेळापत्रकात बदल? भारतीय संघ मुंबईत दक्षिण आफ्रिकेला भिडणार; जाणून घ्या तारीख...

Crime News : लग्नास नकार, महिलेने सुडातून एक्स बॉयफ्रेंडच्या पत्नीला टोचले एचआयव्हीचे इंजेक्शन, 'असा' झाला खुलासा

Republic Day Sale: वॉव! प्रजासत्ताक दिनानिमित्त 'या' ब्रॅण्डवर आहे मोठी सूट, कपड्यांवर 70 टक्के डिस्काऊंट

पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मुलगा निघाला 'लफडेबाज'; घरकाम करणाऱ्या महिलेवर जबरदस्ती अन् नंतर...

Latest Marathi news Live Update : शूटिंगच्या नावाखाली तरुणीची फसवणूक

SCROLL FOR NEXT