Marathi actors expressed grief over Sindhutai Sapkal's demise 
मनोरंजन

'समाजसेवेचं एक पर्व संपलं'; मराठी कलाकारांनी सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली

स्पृहा जोशीने कवितेतून व्यक्त केल्या भावना

स्वाती वेमूल

अनाथांची माय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या निधनानंतर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित माईंना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री स्पृहा जोशीने माईंसाठी कविता लिहिली आहे. तर 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडितने भावूक पोस्ट लिहिली आहे.

'असेच होते.. पदर तिचा मायाळू अजुनी मला सोडवत नाही. ती नाही.. हा विचारसुद्धा मला सोसवत नाही. वाटायचे अनेकदा मी मोठी झाली आहे. मात्र एकटेपणा घराचा मुळी साहवत नाही..', कवितेतील अशा शब्दांतून स्पृहा व्यक्त झाली. अभिनेता प्रसाद ओक, सुबोध भावे, स्वप्निल जोशी, हेमंत ढोमे यांनीसुद्धा शोक व्यक्त केला. 'पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ आज आपल्यात नाहीत. खरंच दु:खद घटना. त्यांच्या आजवरच्या महान कार्याला मानाचा मुजरा, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना', अशा शब्दांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने श्रद्धांजली वाहिली. 'समाजसेवेचं एक पर्व संपलं', असं रेणुका शहाणे यांनी लिहिलं.

सिंधुताई सपकाळ ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या. अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. नकोशी असलेली मुलगी म्हणून त्यांना चिंधी या नावाने ओळखलं जात होतं. मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकलेल्या सिंधुताईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. वैवाहिक आयुष्यातील संघर्षानंतर त्यांनी अनाथ मुलांसाठी काम करण्याचा वसा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पण ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध

Stock Market IPO : या IPO ला तब्बल 1000 पट सब्स्क्रिप्शन; GMP मध्येही चमक, गुंतवणूकदारांना पैसा डबल करण्याची संधी?

Pune Election : तीन दिवसांत ६७२ अर्ज नेले; नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारांची गर्दी; मात्र प्रत्यक्षात फक्त एक अर्ज दाखल!

Ambegaon Political : युती-अनिश्चिततेत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बालाजीनगर प्रभागात पाचही जागा स्वबळावर लढवणार!

Latest Marathi News Live Update : बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणातील लुथरा ब्रदर्स यांच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT