taarak mehta
taarak mehta 
मनोरंजन

बबिता-टप्पूच्या अफेअरवर 'जेठालाल'च्या भन्नाट मीम्स व्हायरल

स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत बबिता आणि टप्पूची भूमिका साकारणारे कलाकार मुनमुन दत्ता Munmun Dutta आणि राज अनाडकत Raj Anadkat हे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा होती. मात्र आता 'ई टाइम्स'ने या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. मालिकेत टप्पू हा जेठालालचा मुलगा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अफेअरच्या चर्चांवर जेठालालची काय प्रतिक्रिया असेल, यावरून हे मीम्स व्हायरल होत आहेत.

'तारक मेहता..'च्या टीमला मुनमुन-राजच्या अफेअरविषयी माहिती

'तारक मेहता..'च्या टीममध्ये सर्वांना या दोघांच्या अफेअरबद्दल माहित आहे. इतकंच नव्हे तर मुनमुन आणि राजच्या कुटुंबीयांनाही त्यांच्याविषयी माहित असल्याचं कळतंय. गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत. डिसेंबर २०२० मध्ये या दोघांच्या डिनर डेटचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मुनमुन आणि राज या दोघांच्या वयात नऊ वर्षांचं अंतर आहे. राज २४ वर्षांचा आहे तर मुनमुन ३३ वर्षांची आहे. सोशल मीडियावरील मुनमुनच्या फोटोंवर राजने अनेकदा कमेंट्स केल्या होत्या. त्यावरून त्याला ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. डिसेंबर २०२० मध्ये या दोघांच्या डिनर डेटचे फोटो व्हायरल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT