Gadar 2 Movie Ameesha Patel Allegation on Anil  
मनोरंजन

Gadar 2 : अनिल शर्मांचे 'ते' चॅट अजुनही माझ्याकडे! 'गदर' च्या अमिषाचा खळबळजनक आरोप

अमिषानं म्हटले आहे की, माझ्यात अनिल शर्मा यांच्यात फारसा संवाद नव्हता. पण....

युगंधर ताजणे

Gadar 2 Movie Ameesha Patel Alligation : गदर २ भलेही बॉक्स ऑफिसवर हिट झाला असेल पण त्यावरुन काही वादही समोर आले आहेत. त्यात अमिषा पटेलचा आणि दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा वाद अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. अमिषानं देखील आपल्या नावापेक्षा शर्मा यांच्या मनात दुसऱ्याच अभिनेत्रीचे नाव होते असेही अमिषानं म्हटले आहे.

अमिषानं म्हटले आहे की, माझ्यात अनिल शर्मा यांच्यात फारसा संवाद नव्हता. पण काही असले तरी मी त्यांना माझ्या कुटूंबातील सदस्य असेच समजत होते. न्यूज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमिषानं असे म्हटले आहे की, मी सगळ्यांना सांगते की, आमच्यात सगळे काही आलबेल होते असे नाही.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

गदरच्या पहिल्या भागात अनिल शर्मा यांना मी नकोच होते. त्यांनी तर ममता कुलकर्णीच्या नावाचा विचार केला होता. नितीन केनी यांनी माझ्याविषयी शर्मा यांना सांगितले तेव्हा माझी वर्णी गदरमध्ये लागली. तर तारा सिंगच्या रोलमध्ये ते सनी देओलऐवजी गोविंदाला घेणार होते. अनिल शर्मा यांनी तसे ट्विट देखील केले होते. आणि त्याचे चॅट अजूनही माझ्याकडे आहे. त्यांनी माझ्या बिझनेस पार्टनरला विनंती केली होती की, ते चॅट डिलीट करुन टाका. असा धक्कादायक खुलासा अमिषानं केला आहे.

अनिल शर्मा यांनी मला जे काही कमिट केले होते त्याबद्दल त्यांनी माझी निराशा केली आहे. त्यांनी त्या कमिट्समेंट पूर्ण केलेल्या नाहीत. एक आहे की, ते मला माझ्या कुटूंबाप्रमाणे आहेत. त्यामुळे मी त्याचे फारसे मनावर घेत नाही. पण या गोष्टी खूप महत्वाच्या देखील आहे. हिंदूस्थान टाईम्समध्ये आलेल्या एका बातमीनं याबाबत काही बाबी समोर आल्या आहेत.

गेल्या २३ वर्षांत आमच्यामध्ये खूपदा भांडणं झाली. पण त्यात नात्यात कटूता आलेली नाही. मी अनिल शर्मा यांना सांगितले होते की, मी तेव्हाच गदर २ मध्ये काम करेल जेव्हा मला त्यात महत्वाची भूमिका मिळेल. गदरच्या पहिल्या भागात ज्याप्रकारे मला भूमिका मिळाली होती तशीच भूमिका मला आताही मिळायला हवी. असे माझे म्हणणे होते. आणि त्यानुसार मला भूमिका मिळाली.

अनिल शर्मा यांनी त्यांच्या मुलाला जास्त प्राधान्य दिले....

अमिषानं म्हटले आहे की, मला अनिलजी यांचे एका गोष्टीचे नवल वाटते की, त्यांनी गदर २ मध्ये त्यांच्या मुलाला जास्त प्रमोट केले. मात्र यावेळी देखील तारा आणि सकीना यांनीच सगळे क्रेडिट घेतले. मला उत्कर्ष माहिती आहे. तो खूप चांगला मुलगा आहे. मीच त्याला इंडस्ट्रीमध्ये घेऊन आले. त्याचे वडील त्याला प्रमोट करत आहे ही कौतुकाची बाब म्हणावी लागेल.

यापुढील काळात बॉलीवूडमधील अनेकजणं उत्कर्षला प्रमोट करतील किंवा त्याला आपल्या चित्रपटांमध्ये घेतील याचे कारण दरवेळी त्याला त्याच्या वडीलांनी ब्रेक देणे हे काही बरे नव्हे. वडीलांनी त्यांच्या चित्रपटामध्ये त्याला साईन करणे चांगले दिसत नाही. असेही अमिषानं यावेळी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT