Ameesha Patel Post Esakal
मनोरंजन

Gadar 2: गदरच्या सकिनानं सस्पेन्सच सांगून टाकला! नेटकऱ्यांचा डोक्याला हात..

Vaishali Patil

Gadar 2 Ameesha Patel Post: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा गदर चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला होता. चित्रपटाचा सिक्वेल 'गदर २' ची घोषणा झाल्यापासूनच चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहे.

'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याआधी, 'गदर 2' चित्रपटाशी नवनवीन अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. जे चाहत्यांची उत्सुकता वाढवत असते.

दरम्यान, दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' चित्रपटातील 'उड जा काले कावा' गाणही रिलिज करण्यात आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना आवडलं.

आता चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अमिषा पटेल हिने सोशल मिडियावर पोस्ट एक शेयर केली आहे. ज्यामुळे आता तिला ट्रोलही करण्यात येत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर खळबळ माजली आहे. त्याच कारण होत चित्रपटातील एक सीन.

या टीझरच्या शेवटी एक सीन दाखवण्यात आला आहे ज्यामध्ये तारा सिंह कबरीसमोर बसून रडत आहे. टीझर पाहिल्यानंतर अनेकांना असं वाटलं की, या चित्रपटात सकिना मरेल. तसचं काहीस शेवटी दाखवण्यातही आलं होतं. यामुळे सस्पेन्स वाढला आणि चित्रपट पाहण्याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये वाढली होती.

आता सकीनाची भूमिका करणाऱ्या अमिषा पटेलने याबद्दलच सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल सांगतिलं आहे. तिची ही सर्वजण अमिषाला सांगत आहेत की तिने चित्रपट पाहण्याचा सस्पेन्स संपवला आहे.

अमिषाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सीनचा फोटो शेअर करताना अमिषाने लिहिले की, 'माझ्या सर्व लाडक्या चाहत्यांनो. गदर 2 च्या या शॉटबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही काळजी वाटत असेल की चित्रपटात सकीना मेली आहे. तर मी तुम्हाला सांगते की असं काही झालेलं नाही. ती कोण आहे हे मी सांगू शकत नाही पण ती सकीना नाही. त्यामुळे काळजी करू नका. मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करते'

अमिषाने चाहत्यांना ही माहिती दिली मात्र तो मोठा स्पॉयलर ठरला. अमिषाच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत.

'तुला डोक नाही का, या सस्पेन्समुळेच चित्रपट चालला असता', 'तू सगळा सस्पेन्स संपवला आहेस', 'तू काय हिरोईन बनशील,सगळं सांगून टाकलं'. तर काहींनी पुर्ण स्टोरीच सागूंन टाक अशा अनेक कमेंट करत तिला ट्रोल केल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT