Gadar 2 Success Party: Gadar 2 Success Party From Salman Khan, Ajay Devgn, Kartik Aaryan to -bollywood stars gathered  Esakal
मनोरंजन

Gadar 2 Success Party: सनीनं अखेर 'गदर' केलाच! हिट होताच दिली दणक्यात सक्सेस पार्टी.. बॉलिवूड स्टार्सची भरली जत्रा

Vaishali Patil

Gadar 2 Success Party: गेल्या काही दिवसापासुन बॉक्स ऑफिसवर एका सिनेमाने धुमाकूळ घातला होता. तो सिनेमा म्हणजे सनी देओल आणि अमिषा पटेलचा गदर 2. या चित्रपटाने रिलिज होताच सर्वच रेकॉर्ड मोडले. चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. रिलिज होऊन आता एक महीना होत आला असला तरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे.

या चित्रपटाच्या चांगल्या यशामुळे कलाकारांपासून निर्मात्यांपर्यंत सगळेच खुप खूश आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या टिमने दणक्यात सक्सेस पार्टी दिली.

या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर सनी देओलने मुंबईत 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूड भाईजान सलमान, शाहरुख खान, आमिर खान यांपासून सगळ्याच बी टाऊन कलाकरांनी हजेरी लावली होती.

यात सारा, कियारा, कार्तिक असे तब्बल 40 पेक्षा जास्त बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली होती. इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सना या पार्टीत आमंत्रित करण्यात आलं होते. 2 सप्टेंबरच्या रात्री मुंबईत झालेल्या या पार्टीत प्रसिद्ध व्यक्तींनी रेड कार्पेटवर हजेरी लावली.

या पार्टीचं आकर्षण ठरला तो शाहरुख खान. सनी देओलसोबतचे जूने वाद विसरत त्याने या पार्टीला हजेरी लावली होती. तर दुसरीकडे तिन्ही खान यांनी या पार्टीला उपस्थीत राहत सर्वांचे लक्ष वेधले.

मुलगा सनी देओलच्या चित्रपटाच्या यशानंतर झालेल्या पार्टीत धर्मेंद्र देखील त्यांच्या स्टाईलमध्ये दिसले.

'गदर 2' च्या सक्सेस पार्टीमध्ये सनी देओल पार्टीत निळ्या सूटमध्ये सनीने चाहत्यांची मने जिंकली. त्याचा मुलगा करण देओल, त्याची पत्नी आणि भाऊ बॉबी देखील दिसला. बॉलिवूडचे लोकप्रिय कपल कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी देखील दिसले.

तर दुसरीकडे सलमान खान आणि कार्तिक आर्यन यांनी एकत्र कॅमेऱ्यासमोर पोझ दिली. यावेळी भाईजानसोबत क्रार्तिक खुपच खुश होता.

तर सारा खान तिचा भाऊ इब्राहिमसोबत 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीत सहभागी दिसली होती. साराने पार्टीत कार्तिक आर्यनला मिठीही मारली. सारा आणि कार्तिकचं ब्रेकअप झाल्यानंतर ते खुप दिवसांनंतर एकत्र दिसले.

यासोबत या पार्टीत 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीत शिल्पा शेट्टी, क्रिती सेनॉन, अजय देवगण आणि काजोल, अमिषा पटेल, सनी शेट्टी, संजय दत्त, अनिल कपूर, अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, आयुष. अर्पिता आणि वरुण धवन 'ब्रह्मास्त्र'चे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि 'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शक कबीर खान पार्टीत दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

SCROLL FOR NEXT