Gadar 2 Success party Sunny Deol Shah Rukh Khan together esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan-Sunny Deol : 'ओ मेरे भाई छोटे..!' शाहरुख अन् सनीला एकमेकांचे भाऊ का म्हणताहेत नेटिझन्स, काय आहे खास कारण?

गदर २ च्या सक्सेस पार्टीला बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान, भाईजान सलमान खान आणि बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे सनीला भेटण्यासाठी आले होते.

युगंधर ताजणे

Gadar 2 Success party Sunny Deol Shah Rukh Khan together : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि सनी देओल हे दोन्ही अभिनेते सध्या चर्चेत आले आहेत. सनीचा गदर २ ने बॉक्स ऑफिसवर कमाल केल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटानं तब्बल पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यात आता गदर २ च्या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हजर होते.

गदर २ च्या सक्सेस पार्टीला बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान, भाईजान सलमान खान आणि बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे सनीला भेटण्यासाठी आले होते. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर हे सेलिब्रेटी एकमेकांच्या भेटीला आल्याचे दिसून आले. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसादही मोठा होता.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

पूर्वीपासून सनी देओल आणि शाहरुख, सनी आणि आमिर खान यांच्यात फारसे सख्य नसल्याच्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून समोर आल्या होत्या. शाहरुख आणि सनी य़ांनी डर नावाच्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांनी कधीही एकत्रितपणे काम केले आहे. मात्र दोन्ही सेलिब्रेटी बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर क्लॅश झाले आहेत. त्यात कधी सनी तर कधी शाहरुखची सरशी झाली आहे.

आता सनीच्या गदर २ च्या सक्सेस पार्टीची जोरदार चर्चा आहे. त्यात शाहरुख पासून कार्तिक आर्यन पर्यत अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मात्र त्यात चर्चा रंगली ती सनी आणि शाहरुखच्या गळाभेटीची. त्यानंतर अनेकांनी भाऊ एकत्र आले असे म्हणायला सुरुवात केली. सोशल मीडियावर त्याविषयीचे मीम्स देखील व्हायरल झाले.

शाहरुख आणि सनीला भाऊ म्हणण्याचे कारण म्हणजे ऑगी अँड दि क्रॉकोज आहे. पहिल्यांदा ते काय आहे हे आपण जाणून घेऊयात. ऑगी अँड दि कॉक्रोज नावाचा एक कार्टून शो आहे. यामध्ये ऑगी आणि जॅक हे दोन भाऊ दाखवण्यात आले आहेत. याच्या हिंदी डबिंगमध्ये ऑगी या लहान भावाचा आवाज शाहरुख सारखा आहे, तर जॅकचा आवाज सनी देओल सारखा आहे. भारतात हे कार्टून केवळ लहान मुलांमध्येच नाही, तर तरुण वर्गातही लोकप्रिय आहे.

आता खरोखरचे शाहरूख आणि सनी देओल एकत्र आल्यामुळे कार्टूनमधील दोन सख्खे भाऊ एकत्र आल्याचं नेटीझन्स म्हणत आहेत. याबाबतचे मीम देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.

Gadar 2 Success party Sunny Deol Shah Rukh Khan together

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT