gadar 2 sunny deol celebrates rakshabandhan 2023 with his fans video viral tara sing SAKAL
मनोरंजन

Rakshabandhan 2023: गदर 2 सुपरहिट झाला अन् सनी देओलने फॅन्ससोबत साजरं केलं रक्षाबंधन, व्हिडीओ व्हायरल

अशातच सनी देओलने थिएटरमध्ये फॅन्ससोबत रक्षाबंधन साजरं केलंय.

Devendra Jadhav

आज रक्षाबंधन. बहिण - भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा अनोखा सण. अशातच सनी देओलने थिएटरमध्ये फॅन्ससोबत रक्षाबंधन साजरं केलंय.

सनी देओलचा गदर 2 सुपरहिट झाला शिवाय सनी देओलने महिला फॅन्ससोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.

(gadar 2 sunny deol celebrates rakshabandhan 2023 with his fans video viral tara sing )

सनी देओलचं चाहत्यांसोबत रक्षाबंधन

सनी देओलचा रक्षाबंधन करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. यावेळी अभिनेत्याने 'मैं निकला गड्डी ले के' या गाण्यावर डान्स करत चाहत्यांसोबत रक्षाबंधनाचा सणही साजरा केला. यावेळी सनी पाजीला त्याच्या महिला फॅन्सनी राखी बांधली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक एक करून सर्व महिला सनी देओलला राखी बांधत आहेत.

राखी बांधून अभिनेत्याने बहिणींवरही प्रेमाचा वर्षाव केला. इतकंच नाही तर सनी देओलने आपल्या बहिणींना राखी बांधून गिफ्टही दिलं. अभिनेत्याच्या या फोटो आणि व्हिडिओवर त्याचे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शाळेतल्या विद्यार्थ्यांना सनी देओलने दाखवला गदर 2

सनी देओल लहानांपासुन मोठ्यांपर्यंत त्याच्या फॅन्सचा किती विचार करतो याचा अनुभव नुकताच आला. मुंबईतील अंधेरी येथील सिनेपोलिस सिनेमागृहात आज मुंबईतील एका शाळेतील अनेक मुला-मुलींसाठी 'गदर 2' चं विशेष स्क्रीनींग ठेवण्यात आलं होतं.

सनी देओलही तिथे पोहोचला आणि शाळेतील अनेक मुलींनी त्याला राखी बांधली. सनी पाजीने सुद्धा मुलांना आशिर्वाद देऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळकरी मुलांना 'गदर 2' दाखवण्याचा हा कार्यक्रम 'बेटी फाउंडेशन'च्या अनु रंजन यांनी आयोजित केला होता.

गदर 2 ची ६०० कोटीकडे दमदार वाटचाल

सनी देओलच्या गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलाच गदारोळ माजवलाय. सनी देओलच्या गदर 2 सिनेमाची बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केलीय.

सनी देओलच्या गदर 2 च्या कमाईचा नवीन आकडा समोर आलाय. यात गदर 2 ने ६०० कोटींचा आकडा पार केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे लवकरच गदर 2 ६०० कोटींचा आकडा सहज पार करेल असं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT