Gadar 2 Star Sunny Deol Performs Bhangra On London Streets esakal
मनोरंजन

Gadar 2 Sunny Deol : लंडनच्या रस्त्यावर सनीची इंट्री, टाळ्या-शिट्टयांनी भारतीयांनी केलं स्वागत!

अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे मेकर्सनं ज्याप्रकारे प्रमोशन केले आहे त्याला तोड नाही.

युगंधर ताजणे

Gadar 2 Star Sunny Deol Performs Bhangra On London Streets: सनी देओलच्या गदर २ ने आता केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये मोठी हवा केली आहे. तब्बल २२ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची आता पाचशे कोटींकडे वाटचाल सुरु झाली आहे. गदर २ ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे मेकर्सनं ज्याप्रकारे प्रमोशन केले आहे त्याला तोड नाही. गेल्या आठवड्यापासून गदर २ प्रमोशन टीम खूपच अॅक्टिव्ह झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर देशभरामध्ये जिथे जाईल त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. सनीनं सर्वात प्रथम सैनिकांना त्याची ही फिल्म दाखवली होती. त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या होत्या.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

वाघा- अटारी बॉर्डरवर देखील गदर २ ची टीम गेली होती. तिथेही सनीनं आलेल्या पर्यटकांशी संवाद साधला होता. अटारी सीमेवर देशभक्तीचा जो माहोल होता त्याचीही सोशल मीडियावर खूपच चर्चा झाली. याशिवाय देशातील प्रमुख राज्यांतील काही थिएटरमध्ये सनीनं हजेरी लावली. तिथं तो, अमिषा पटेल, दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रेक्षकांचा उत्साह आणि द्विगुणीत केला होता.

आता सनी हा साता समुद्रापलीकडे लंडनला गेला आहे. तिथंही त्यानं गदरचं प्रमोशन केलं आहे. एवढ्यावरच थांबेल तो सनी कसला त्यानं तिथल्या रस्त्यांवर भांगडा करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात कित्येक भारतीयही आनंदानं सहभागी झाले होते. ट्विटवर हे व्हिडिओ व्हायरल झाले असून सनी आणि गदर च्या टीमवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बॉलीवूडमध्ये ऑगस्टचा महिना फुल्ल टू गदर फिव्हरचा ठरला आहे. गदरची टीम प्रमोशनच्या निमित्तानं लंडनला गेली आहे. यावेळी सनीला पाहण्यासाठी लंडनच्या रस्त्यावर मोठी गर्दी जमल्याचे दिसून आले. लंडनमधील भारतीयांनी सनीचे मनपूर्वक स्वागत करुन त्याच्या गदर २ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सनीनं काही भारतीयांशी संवादही साधला. यावेळी सनीनं त्याची प्रतिक्रियाही दिली आहे.

सनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतो की, दोन दशकांपूर्वी आम्ही गदरच्या पहिल्या भागाची निर्मिती केली होती. आता त्याचा दुसरा भाग तुमच्या भेटीला आला आहे. त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.ही खूपच आनंदाची बाब आहे. गदर ही लोकांना एकमेकांशी जोडून ठेवणारी फिल्म आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव हा कमी झालेला नाही.

सध्या गदर हा भारतीय चित्रपट विश्वामध्ये वेगवेगळे विक्रम करतो आहे. सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली फिल्म म्हणून गदरचे नाव घ्यावे लागेल. लोकांच्या प्रतिसादामुळे आणि त्यांनी केलेल्या कौतुकामुळे गदर मोठी फिल्म झाली. त्यांचे योगदान आणि प्रतिसाद हा विसरता येणार नाही. लोकांमुळे गदरला प्रेम मिळाले. अशी भावना सनीनं याप्रसंगी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT