gadar 2 trailer sunny deol amisha patel utkarsh sharma india pakistan release 11 august SAKAL
मनोरंजन

Gadar 2 Trailer: हँडपम्प, पाकीस्तान आणि तारा सिंग, सनी देओलच्या गदर 2 सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर

गदर 2 सिनेमाच्या ट्रेलरची सोशल मिडीयावर हवा आहे

Devendra Jadhav

Gadar 2 Trailer News: सनी देओलच्या गदर 2 सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. सुरुवातीला टीझर, गाणी आणि आता सिनेमाचा ट्रेलक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. गदर 2 च्या ट्रेलर बुधवारी यु ट्यूब वर रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून सनी देओलचा जलवा पुन्हा एकदा दिसुन येतोय.

गदर 2 सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. पुन्हा एकदा जबरदस्त कथा, तगडे संवाद आणि दमदार अभिनयाच्या जोरावर गदर 2 पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय

(gadar 2 trailer sunny deol amisha patel utkarsha sharma)

गदर 2 च्या ट्रेलरमध्ये काय?

'गदर 2' च्या ट्रेलरची सुरुवात 'अगला जुम्मा दिल्ली में...' सारख्या संवादांनी होते. पुढे पाकिस्तानी मोठ्याने ओरडत आहेत. यानंतर तारा सिंह सीमेवर भारताच्या सैनिकांसह शेजारील देशाच्या सैन्याशी दोन हात करत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो जिथे सकीना आणि तारा त्यांच्या मुलासोबत आनंदाने जगताना दिसतात.

गदर 2 च्या ट्रेलरमध्ये दमदार संवाद

ट्रेलरमध्ये पुढे दिसतं की, एक दिवस तारा सिंगचा मुलगा पाकिस्तानच्या भूमीवर कैद होतो. आणि मग काय तारा सिंह आपला मुलगा पाकिस्तानच्या तावडीतून वाचवण्यासाठी जीवाचं रान करतो. सनी देओल पुन्हा एकदा त्याच्या अॅक्शन अवतारात दहशत निर्माण करताना दिसत आहे.

सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्याशिवाय सिमरत कौरची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळातेय. एकूणच 'गदर 2' प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन देणार आहे हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.

गदर 2 ची रिलीज डेट

गदर हा सिनेमा 22 वर्षांपूर्वी आलेल्या गदर: एक प्रेम कथा सिनेमाचा दुसरा भाग आहे. गदर 2 ची कथा पहिल्या चित्रपटाशी जोडली गेली आहे. गदर मध्ये आपण पाहिलं कि निर्मात्यांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी दाखवणारी प्रेमकथा सादर केली होती. आता गदर 2 सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT