Gadar 2 Vs OMG 2 Akshay Kumar Sing Tu Ghar aaja esakal
मनोरंजन

Gadar 2 Vs OMG 2 : ओएमजी मध्ये 'गदर'? अक्षयला सनीचा सहारा, भगवान शंकर म्हणाले 'तू घर आजा....'!

गदर चित्रपटांमधील गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा होता.

युगंधर ताजणे

Gadar 2 Vs OMG 2 Akshay Kumar Sing Tu Ghar aaja : बॉलीवूडमध्ये सध्या गदर फिव्हर सुरु झाला आहे. दुसरीकडे बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी देखील प्रदर्शित झाला आहे. यासगळ्यात सनीच्या गदरची चर्चा सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. त्याचे कारण त्यानं त्यामध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान असा संघर्ष उभा केला आहे.

दुसरीकडे अक्षयचा ओएमजी २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यामध्ये त्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लैंगिक शिक्षण आणि त्याचे महत्व त्याच्या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक अक्षयनं त्याच्या यापूर्वीच्या अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य केले आहे. त्यात पॅडमन, टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

गदर चित्रपटांमधील गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा होता. गदर २ मध्ये देखील पहिल्याच भागातील गाणी पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात सादर करण्यात आली आहेत. दिग्दर्शकानं मोठ्या खुबीनं ती प्रेक्षकांसमोर आणत त्यांची वाहवा मिळवली आहे. मात्र अक्षय कुमारच्या ओएमजी २ मध्ये गदर ची गाणी ऐकू आल्यानं चाहत्यांना धक्काच बसला आहे.

ओएमजी २ मध्ये अक्षयनं भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. त्यात कांतीलालच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी देखील आहे. यावेळी एका प्रसंगात भगवान शंकर झाडाखाली बसून सनीच्या गदर मधील तू घर आजा परदेसी तेरी मेरी एक जिंदगी हे गाणं म्हणताना दिसतात. ते गाणं ऐकून पंकज त्रिपाठी दिलखुलासपणे प्रतिक्रियाही देतात. या दृष्याच्या काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

सोशल मीडियावर आलेल्या त्या क्लिप्सनं चाहत्यांनी दोन्ही अभिनेत्यांचे कौतूक केले आहे. याशिवाय अक्षय कुमारच्या त्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. बॉक्स ऑफिसवर ओएमजी २ आणि गदर २ हे चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यामध्ये जोरदार टक्कर आहे. त्यात कोण बाजी मारणार असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे. सध्या तरी सनीच्या गदरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

SCROLL FOR NEXT