Ayushmann khurrana Dream girl 2 stuck between gadar 2 OMG 2  esakal
मनोरंजन

Gadar 2 अन् OMG 2 मध्ये 'पूजा' फसणार तर नाही ना? 'Dream Girl 2' मधल्या आयुषमानची डोकेदुखी वाढणार!

ऑगस्ट महिना हा बॉलीवूडसाठी खूपच इंटरेस्टिंग ठरताना दिसतो आहे.

युगंधर ताजणे

Ayushmann khurrana Dream girl 2 stuck between gadar 2 OMG 2 : गदर २ आणि ओएमजी २ मध्ये सनीच्या गदर २ ने बाजी मारली आहे. या चित्रपटानं पाचशे कोटींच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे.आतापर्यत गदर २ ने साडेतीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. यात ओएमजीनं देखील शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

ऑगस्ट महिना हा बॉलीवूडसाठी खूपच इंटरेस्टिंग ठरताना दिसतो आहे. या महिन्यात आतापर्यत रजनीचा जेलर, सनीचा गदर २ आणि अक्षयचा ओएमजी २ प्रदर्शित झाला आहे. येत्या आठवड्यात आयुषमान खुरानाचा ड्रीम गर्ल २ प्रदर्शित होणार असून त्यामध्ये आयुषमान खुरानाची प्रमुख भूमिका आहे. आयुषमानच्या यापूर्वीच्या ड्रीम गर्ल भाग १ ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आता आयुषमानसाठी चिंतेची बाब म्हणजे त्याला सनी देओलचा गदर २ आणि अक्षयच्या ओएमजी २ सोबत फाईट द्यावी लागणार आहे. वास्तविक आयुषमानच्या चित्रपटाचा जॉनर पूर्णपणे वेगळा आहे. कॉमेडी प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटाच्या गाण्याला आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक आयुषमानच्या या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहत होते.

दुसरीकडे असे ऐकायला मिळते आहे की, आयुषमानच्या नव्या चित्रपटाची आगाऊ बूकींगही जोरात होताना दिसत आहे. अशातच दोन तगड्या अभिनेत्यांचे आव्हानही आयुषमानुपुढे असणार आहे. त्यामुळे एकुणच या चित्रपटाचा माहोल अद्याप तयार झालेला दिसून येत नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे सध्या गदर २ आणि ओएमजी २ ची वातावरण निर्मिती अजूनही कायम आहे. गदर २ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. त्यामुळे येत्या काळात आयुषमानला स्वताची छाप उमटविण्यासाठी मोठी फाईट द्यावी लागणार आहे हे नक्की...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Incident: बायकोशी भांडण झालं अन् तरुणाने थेट हवाई दलाच्या भिंतीवरून उडी मारली; पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं!

Gold Rate Today : सोनं-चांदीची चमक कायम! खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचा भाव

माजी BMC आयुक्तांची निवृत्तीनंतर राज्यमंत्री दर्जाच्या पदी नियुक्ती, IAS इकबाल सिंह चहल यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

Stock Market Today : बजेटपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण! मात्र तिमाही निकालामुळे या शेअरमध्ये तेजी; कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : आदिवासी शेतकऱ्यांच्या लाल वादळाच्या लाँग मार्चवर तोडग्यासाठी हालचाली

SCROLL FOR NEXT