Gadar Director Anil Sharma Shared Sakina Role esakal
मनोरंजन

Gadar Ameesha Patel : 'गदरमध्ये अमिषा नकोच होती, तिच्याऐवजी मला....! दिग्दर्शक अनिल शर्मांनी कुणाचं घेतलं नाव?

ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम केला आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळवली त्या गदर २ ची चर्चा अजूनही कायम आहे.

युगंधर ताजणे

Gadar Director Anil Sharma Shared Sakina Role : ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम केला आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळवली त्या गदर २ ची चर्चा अजूनही कायम आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल २२ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

आता अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये गदर मध्ये आपल्या अमिषाऐवजी बॉलीवूडमधील दुसऱ्याच अभिनेत्रीला कास्ट करायचे होते असे सांगितले. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, त्यांना नेमक्या कोणत्या अभिनेत्रीला गदरमध्ये घ्यायचे होते. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात गदर ची सर्वाधिक चर्चा आहे. त्यानं पाचशे कोटींपेक्षा अधिक कमाई करुन आपल्या नावावर वेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

सनी देओल, अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेल्या गदर २ वरुन काही अंशी वादही झाला होता. सोशल मीडियावर त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही समोर आल्या होता. सनीनं या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बरीच मेहनत केली होती. भारतीय सैन्य दलापासून देशातील मोठमोठ्या थिएटरमध्ये जाऊन त्यानं प्रेक्षकांचे आभार मानले होते. पत्रकार परिषेदतून आपला हा चित्रपट नक्की पाहा असे आवाहनही केले होते.

यासगळ्यात अनिल शर्मा यांनी गदर २ च्या सक्सेस पार्टीमध्ये गदर ३ ची देखील घोषणा केल्याचे सांगितले होते. त्यामुळे येणाऱ्या भागात तारा सिंग काय धाडस दाखवणार याची प्रेक्षकांना, चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्यात अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या गदर मध्ये अमिषाऐवजी ऐश्वर्या रॉयला त्या भूमिकेसाठी कास्ट करायचे होते. असे सांगितले आहे.

अनिल शर्मा यांनी बॉलीवूड ठिकाणाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याविषयी त्यांनी हे विधान केले असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अमिषानं गदर मध्ये सकीनाची भूमिका साकारली होती. तिच्या त्या भूमिकेचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केले. त्या भूमिकेनं अमिषाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. शर्मा म्हणाले सकीना म्हणून पहिल्यांदा माझ्या मनात ऐश्वर्याच्या नावाचा विचार आला होता.

गदरमधील सकीनच्या भूमिकेसाठी माझ्या मनात ऐश्वर्या आणि काजोल या दोन अभिनेत्रींची नावं होती. मी त्यांना स्क्रिप्टही सांगितली होती. त्यांना ती आवडलीही. मात्र काही कारणास्तव ते जमले नाही. आता त्यांनी का नकार दिला यावर मला चर्चा करण्यात काहीही रस नाही. असेही शर्मा यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dnyaneshwari Munde: परळीच्या बंगल्यावरुन कॉल आला अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप! 18 महिन्यात 8 तपास अधिकारी बदलले, आरोपी मोकाट

Latest Marathi News Updates : घनसावंगीमध्ये महिन्याभरानंतर जोरदार पाऊस

संतापजनक! सात वर्षीय चिमुरडीवर रिक्षा चालकाने केला बलात्कार; आरोपी तन्वीरला मियाँ दर्ग्याजवळून अटक, ती जोरजोरात ओरडू लागली अन्..

Ichalkaranji Gang War : एका हातात हत्यारे, दुसऱ्या हातात फटाके वजीर गँगची दहशत; महिलेवर जीवघेणा हल्ला, इचलकरंजीचा झालाय बिहार

ICC Meeting: द्विस्तरीय कसोटी क्रिकेटवर चर्चा अपेक्षित; आयसीसीची आजपासून विशेष सर्वसाधारण सभा

SCROLL FOR NEXT