Gadar 2 Movie Review Sunny Deol smash performance
Gadar 2 Movie Review Sunny Deol smash performance esakal
मनोरंजन

Gadar 2 Review : तुम्ही दरवेळी पाकिस्तानात जायचं, तोडफोड करुन भारतात यायचं, प्रेक्षकांनी ते पाहायचं! म्हणजे आम्ही वेडे?

युगंधर ताजणे

Gadar 2 Movie Review Sunny Deol smash performance : सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा गदर २ एकदाचा प्रदर्शित झाला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल २३ वर्षांच्या अंतरानं प्रदर्शित झाला आहे. एवढ्या मोठ्या कालवधीनंत हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं त्याच्याकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सनीनं यावेळी प्रेक्षकांची निराशा केल्याचे दिसून आले आहे.

गदर पासून सनीला पाकिस्तानचा जावई असं लाडानं म्हटलं जाऊ लागलं. त्यानं पहिल्या भागामध्ये ज्याप्रकारे परफॉर्मन्स दिला होता त्या तुलनेत दुसऱ्या भागात तारासिंग कमी पडल्याचे दिसून येते. त्याच्या चेहऱ्यावर नाही म्हटलं तरी थकलेपणाची झाक आहे. अजूनही त्याच्या मनात काही गोष्टींबाबत राग आहेच पण तो पहिल्या तारा सिंगपेक्षा वेगळाच आहे. त्याचा मुलगा चरणजीत सिंग, पत्नी सकीना अन् तारा अशा या कुटूंबात पुन्हा मोठं वादळ आलं आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

गदर २ मध्ये सनीकडून प्रेक्षकांनी जरा जास्तच अपेक्षा केली हे मात्र खरे आहे. त्या सगळ्या अपेक्षांचे ओझे एकट्या सनीवर आल्यानं त्याला ते पूर्ण करणे जरा अवघड होऊन बसले आहे. खरं सांगायचं झाल्यास कुणी काहीही म्हटले तरी पहिला गदर आणि दुसरा गदर यांच्यात तुलना केल्याशिवाय त्याविषयी बोलता येणार नाही. कथानक म्हणावे इतके दमदार नाही. अभिनय सनी देओल वगळता बाकी कुणाचाही आवर्जून कौतूक करावा असा नाही. अमिशानं चांगली भूमिका करणे यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागेल.(Gadar 2 Review In Marathi)

Gadar 2 Movie Review Sunny Deol

अनिल शर्मा यांनी त्यांच्या मुलाला लाँच करायचे म्हणून गदर २ चा घाट घातला की काय असा प्रश्न पडतो. बाकी चित्रपटात नवीन असे काही नाही. भारत- पाकिस्तान म्हटल्यावर प्रेक्षकांना काही करुन त्यावर आधारित चित्रपट पाहायला गेलेच पाहिजे अशी मानसिकता होणे स्वाभाविक आहे. कारण आपल्याकडे अँटी नॅशनल, क्राईम, सस्पेन्स, थ्रिलर या विषयांवर आधारित चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

पहिल्या भागात सनीनं पाकिस्तानात जाऊन खूपच तोडफोड केली होती. पाकिस्तानचे जनरल अशर्रफ अली यांना धमकी देऊन तो आला होता. हँडपंप उखडून त्यानं तो पाकिस्तानी लोकांवर भिरकावून दिला होता. आता तर त्याना थेट लाईटचा खांब, तोफगाड्याचे चाक, पाकिस्तानी सैन्यावर फेकले आहे. यावेळी देखील त्याला भलताच राग आला आहे. त्याच्या मुलाला पाकिस्तानी सैन्यानं पकडून ठेवले आहे. त्याच्यावर भलते सलते आरोपही केले आहेत. त्यामुळे त्याला सगळ्या पाकिस्तानी लोकांसमोर फाशी देण्यात येणार आहे.

तारा सिंगला जेव्हा कळते की, जीत आपल्याला शोधायला पाकिस्तानात गेला आहे तेव्हा तो सकीनावर चांगलाच संतापतो. किमान तुला तरी कळायला हवे होते. असे म्हणून तिच्यावर तो आगपाखड करतो. वास्तविक जीतला वाटते त्यादिवशी रामटेकडीवर ट्रक घेऊन गेलेल्या आपल्या वडिलांना पाकिस्तानी सैन्यांनी बंदी म्हणून नेले आहे. आणि ते पुन्हा येणं खूपच कठीण आहे. त्यांना काही करुन सोडविण्यासाठी तो बैचेन होतो. पाकिस्तानात जातो. तिथं तो जे काही करतो त्यासाठी बापाला म्हणजे तारा सिंगला मोठी किंमत चुकवावी लागते.

तारा सिंग पाकिस्तानात जाण्याची तयारी सुरु करतो. त्याला काय माहिती मुलानं तिकडं काय पराक्रम करुन ठेवला आहे ते...जीत पाकिस्तानात मुस्कानच्या प्रेमात पडतो. मुस्कान तर त्याच्यासोबत लग्न करण्याचा विचार करु लागते. शेवटी पाकिस्तानच्या आर्मीला जित कोण आहे आणि तो कशासाठी पाकिस्तानात आला आहे याविषयी कळते ते त्याला अटक करतात. यासगळ्यात तारा सिंगची मुलाला सोडविण्यासाठीची धडपड, त्यासाठी त्यानं केलेला संघर्ष हे पुन्हा एकदा जाणून घ्यायचे असल्यास गदर २ पाहायला जा..

२३ वर्षांनी दुसरा भाग प्रदर्शित होत असल्यानं या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण होताना दिसत नाही. गेल्या गदर मध्ये ज्या ताकदीचे संवाद होते त्यात एकही नाही. एकही संवाद टाळ्या, शिट्यांची दाद मिळवताना दिसत नाही. काय तो फक्त तूम कटोरा लेके भिग मागोके या संवादाला प्रेक्षकांकडून थोडाफार प्रतिसाद दिसून येतो. जो कुणी व्हिलन आहे त्यानं बऱ्यापैकी संघर्ष उभा करण्याचा अन् लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तो फार तोकडा आहे.

Gadar 2 review

सनी वगळता कुणाची अॅक्टिंगही तितकीशी प्रभावी नाही. अमिषा फारच अशक्त वाटू लागते. तिच्या वाट्याला तसंही फारसं काम नाही. पण सनी अन् अमिषामधील फ्लॅशबॅक बऱ्याचदा चित्रपटात येतात आणि त्रस्त करु लागतात. मागच्या चित्रपटात अमूक वेळी काय घडले होते आणि आता काय होते हे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं या निमित्तानं केला आहे पण तो सारखा सारखा केल्यानं तापदायक वाटू लागतो. चित्रपटाची लांबी वाढवून ठेवल्यानं कंटाळा आल्याशिवाय राहत नाही.

दिग्दर्शकाला गदर २ ची लांबी जरा कमी करता आली असती. मुलगा जीतचे पाकिस्तानात जाणे, तिथं त्याचे प्रेमप्रकरण, त्यात नको तितका वेळ घेतला आहे. त्यामुळे पूर्वाध कमालीचा संथ असून उत्तरार्धात गदर २ हा रंगतदार वाटू लागतो. सनी केव्हा पडद्यावर येतो आणि एकदाचा त्याच्या मुलाला भारतात घेऊन जातो हे आपल्याला वाटू लागते. १७० मिनिटांच्या गदर मध्ये किमान अर्धा तास तर नक्कीच कमी करता आला असता.

दुसरं म्हणजे चित्रपटातील गाणी ही वैतागवाडी वाटू लागते. पहिल्याच भागातील गाणी थोड्याशा वेगळ्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ती गाणी छानच होती. पण नव्या गदर मधील गाणी फारच निराशा करणारी आहेत. त्यात काही जीवच नाही. एक दोनच कडव्यात गाणं संपतं, त्याला म्हणावे असे चांगले संगीतही नाही. केवळ बळजबरीनं चित्रपटाची लांबी वाढविण्यासाठी गाण्यांचा घाट घातला की काय असे जाणवते.

तुम्ही सनी देओलचे फॅन असाल आणि तुम्ही गदरचा पहिला भाग पाहिला असेल तर मग तुम्ही गदर २ च्या वाटेला जायला हरकत नाही. तुम्हाला दुसऱ्या भागात सनीनं किती राडा केला आहे हे तुमचे मनोरंजन करेल यात शंका नाही. गदर २ हा एक फॅमिली मुव्ही आहे. त्यामुळे सहकुटूंब, सहपरिवार हा चित्रपट पाहायला जाताय तर जरुर जा, मनोरंजन होईल पण थोडा संयम ठेवावा लागेल. तारा सिंग जोपर्यत पडद्यावर येत नाही तोपर्यत तुम्हाला बरे वाटणार नाही.

Gadar Movie review

अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट मोठे आहे, त्याचे निर्मितीमुल्यही प्रचंड आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा म्हणून जोरानं प्रमोशनही केलं आहे. अटारी, वाघा बॉर्डरवर सनी, अमिषा जाऊन आले आहेत. तिथं त्यांनी भारत माता की जय नावाच्या घोषणाही दिल्या आहेत. अशावेळी सोशल मीडियावर देखील मोठ्या हुशारीनं वेगवेगळे ट्रेंड सुरु झाले आहे. खरा गदर विरुद्ध खोटा गदर असा प्रचारही होतो आहे. हे काहीही केलं तरी स्टोरीमध्ये दम नसेल तर मग कुणीच काही करु शकत नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

पहिल्या भागात तारा सिंग प्रेमासाठी पाकिस्तानसोबत पंगा घ्यायला तयार झाला. सकीनसाठी कायपण म्हणत त्यानं मोठं युद्धच छेडलं होतं. त्यात यशस्वी झाला. तो काळ १९५४ चा असे त्या चित्रपटाच्या सुरुवातीला दिसते. त्यानंतर आताची कथा ही १९७२ मध्ये घडते. त्यातही पुन्हा त्याच धर्तीवर कथानक घडत असल्यास काही वेगळ्या कथेची आणि प्रसंगांची अपेक्षा प्रेक्षकांची असणं हे स्वाभाविक आहे. केवळ सुटकेसाठी एवढा 'गदर' करुन वेगळी वातावरण निर्मिती हा हास्यास्पद वाटते.

सनीनं या चित्रपटासाठी मोठी मेहनत केल्याचे दिसून येते. त्याचा फिटनेस कौतूकास्पद आहे. त्याचा स्वॅग, त्याची स्टाईल, आवाज दमदार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काही करुन तारा सिंग सारखा पडद्यावर हवा आहे. मात्र तसे होत नाही. तो सुरुवातीचा काही वेळ दिसतो त्यानंतर मध्यांतरानंतर येतो. तोपर्यत आपण मात्र तारा सिंग येणार अन् सगळं नीट करुन जाणार असे म्हणत वाट पाहत बसतो. नेमकं काय चाललंय हेच कळेनासं होतं...

चित्रपटाचे नाव - गदर २

दिग्दर्शकाचे नाव - अनिल शर्मा

कलाकार - सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मुश्ताक खान, राकेश बेदी

रेटिंग - **1/2 (अडीच स्टार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT