उद्योगपती राज कुंद्राला पॉर्न फिल्म्स (porn films) तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेनं अटक केली आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. यामध्येच अभिनेत्री गहना वशिष्ठने राजला पाठिंबा दिला असून राज पॉर्न नव्हे तर इरोटिका तयार करतो असंही तिने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी गहनालादेखील फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता गहनाने इन्स्टाग्राम लाइव्हवर न्यूड होऊन चाहत्यांशी संवाद साधला आहे. त्यामुळे गहना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (gahna vasisth comes nude on insta live ask fans am i looking vulgar)
सध्या सोशल मीडियावर गहनाचा इन्स्टा लाइव्हचा न्यूड व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नेटकऱ्यांना न्यूड असणं वल्गर आहे का? असा प्रश्नदेखील विचारला आहे.
"मी तुमच्या सगळ्यांसमोर लाइव्ह आले आहे. मला एक सांगा मी सध्या असभ्य (वल्गर) किंवा बीभत्स वाटतीये का? किंवा हे सगळं पॉर्न कॅटेगरीत मोडतंय असं वाटतंय का? तुम्हीच पाहा, मी आता कोणतेच कपडे परिधान केलेले नाहीत. तरीदेखील तुम्ही मला पॉर्न किंवा अन्य तत्सम कॅटेगरीत मोडत नाहीत. परंतु, बाकीच्या काही व्हिडीओजमध्ये मी व्यवस्थित कपडे परिधान केले असतानादेखील त्या व्हिडीओजला पॉर्न व्हिडीओ म्हटलं जात आहे. हे फार चुकीचं आहे. एकीकडे सगळे म्हणतायेत मी पॉर्न व्हिडीओ शूट केला आणि दुसरीकडे आता मी एकही कपडा परिधान केला नसून सुद्धा या व्हिडीओला पॉर्न म्हणत नाहीयेत. हे तर हायप्रोक्राइसीची हद्दच झाली", असं गहना या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
"कपड्यांशिवाय लाइव्ह. या व्हिडीओमध्ये मी कपड्यांशिवाय लाइव्ह केलंय. मात्र, याला कोणीच पॉर्न म्हणत नाहीये.उलटपक्षी मी कपडे घालून व्हिडीओ शूट केला तर त्याला काही लोक पॉर्न म्हणत आहेत," असं कॅप्शन गहनाने हा व्हिडीओ शेअर करत दिलं आहे.
दरम्यान, अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला फेब्रुवारी महिन्यात अटक झाली होती. ४ फेब्रुवारी २०२० रोजी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे मालमत्ता कक्षाने छापा टाकला, तेव्हा अर्धनग्न अवस्थेत तरुण-तरुणींच्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यानुसार पथकाने दोन महिलांसह पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात गहना वशिष्ठचे नाव समोर आले. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेब साइटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.