Gal Gadot esakal
मनोरंजन

Gal Gadot: 'वंडर वुमेन' 38 व्या वर्षी चौथ्यांदा झाली आई; शेअर केला लेकीचा फोटो

Gal Gadot: 'वंडर वुमन' (Wonder Woman) फेम गॅल गॅडोटनं 6 मार्च रोजी तिच्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर शेअर केला.

priyanka kulkarni

Gal Gadot: हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गॅडोट (Gal Gadot) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. गॅल चौथ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. 'वंडर वुमन' (Wonder Woman) फेम गॅल गॅडोटनं 6 मार्च रोजी तिच्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर शेअर केला. या फोटोमध्ये गॅल ही तिच्या लेकीसोबत हॉस्पिटलमधील दिसत आहे.

गॅल गॅडोटने सोशल मीडियावर तिच्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गॅल हॉस्पिटलच्या बेडवर लेकीसोबत बसलेली दिसत आहे. या फोटोला गॅलनं कॅप्शन दिलं, "माझ्या प्रिय मुली, तुझं स्वागत आहे. तू आमच्या जीवनात खूप प्रकाश आणला आहेस, या मुलींच्या घरात तुझं स्वागत आहे. तुझे डॅडी खूप कूल आहेत." गॅलनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहे.

गॅलच्या मुलीचं नाव

गॅलनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या मुलीच्या नावाची देखील माहिती दिली आहे. गॅलनं तिच्या मुलीचं नाव 'ओरी' असं ठेवलं आहे. ज्याचा अर्थ हिब्रूमध्ये प्रकाश असा होतो.

गॅल गॅडोटने 2008 मध्ये जारोन वर्सानोसोबत लग्न केलं. गॅल आणि जारोन यांना 2011 मध्ये मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी अल्मा असं ठेवले. त्यानंतर 2017 मध्ये गॅल दुसऱ्यांदा आई झाली. दुसऱ्या मुलीचं नाव माया ठेवलं. 2021 मध्ये गॅलनं तिसरी मुलगी डॅनिएलाला जन्म दिला. आता गॅल ही चौथ्यांदा आई झाली आहे.

गॅल गॅडोटचे चित्रपट

गॅलनं हॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'वंडर वुमन' या चित्रपटामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. फास्ट अँड फ्युरियस-6, डेट नाईट, रेड नोटिस, हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटांमध्ये देखील गॅलनं काम केलं आहे. तसेच गॅलनं द ब्युटिफुल लाईफ, अस्फुर या टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे. गर्ल्स लाइक यू, इमॅजिन आणि, क्विट या म्युझिक व्हिडीओमध्ये देखील गॅल दिसली होती. आता गॅलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

आगामी चित्रपट

गॅल गॅडोट सध्या डिस्नेच्या स्नो व्हाईट या चित्रपटातील एव्हिल क्वीनच्या भूमिकेची तयारी करत आहे. हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

Latest Marathi News Live Update: सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

या मूलांकाच्या लोकांपासून सावध राहा ! अंतर्ज्ञानी असतात हे लोक; भविष्यातील घटना आधीच समजतात

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT