आलिया भटची हाॅलीवूड वारी! वंडर वुमनबरोबरचा सेल्फी व्हायरल | Alia Bhatt And Hollywood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt And Gal Gadot

आलिया भटची हाॅलीवूड वारी! वंडर वुमनबरोबरचा सेल्फी व्हायरल

आलिया भट एकानंतर एक आनंदाची बातमी देण्यामागे लागली काय, असा प्रश्न सध्या पडला आहे. आपल्या गरोदरपणाविषयी घोषणा केल्यानंतर तिने आपल्या नवीन चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. आलिया लवकरच हाॅलिवूडमध्ये (Hollywood) दिसणार आहे. ती 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये (Heart Of Stone) महत्त्वाची भूमिका करताना दिसेल. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झाले आहे. आलियाची सहकलाकार आणि वंडर वुमन गॅल गडोटने बरोबर एक सुंदर सेल्फी शेअर केली आहे. (Alia Bhatt Wraps Heart Of Stone Shoot Gal Gadot Happy Selfie Goes Viral)

हेही वाचा: 'शक्तिमान'नंतर आता 'कॅप्टन व्योम'ही नवीन अवतारात येणार !

वंडर वुमनने शेअर केली सेल्फी

आलिया भटने (Alia Bhatt) चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. गॅल गडोटने (Gal Gadot) त्यांच्याबरोबर काढलेली सेल्फी शेअर केली. चित्रपटात दोन्ही अभिनेत्री स्मितहास्य करताना दिसत आहेत. गॅलने लिहिले, माझी मैत्रीण आलिया भटसाठी थोडासा प्रेम दाखवावा. त्यांनी आज आपल्या हार्ट ऑफ स्टोनचे शूट रॅप केले. ती एक खूपच उत्कृष्ट आणि महान व्यक्ती आहे.

हेही वाचा: PHOTO: सिरीयलमध्ये दरारा निर्माण करणाऱ्या कोमोलिकाचा खऱ्या आयुष्याचा संघर्ष

हाॅलीवूड पाऊल ठेवण्यास आलिया उत्सुक

चित्रपटाच्या सेट्सचे आलिया भटनेही आपले काही फोटोजही शेअर केले आहे. तिने आपल्या पात्राची फर्स्ट लूकही चाहत्यांसमोर आणले आहे. फोटोज् शेअर करत आलियाने लिहिले, हार्ट ऑफ स्टोन... तुझ्याजवळ माझे हृदय आहे. सुंदर गॅल गडोटचे धन्यवाद. माझ्या दिग्दर्शक टाॅम हार्पर यांचे आभार ! मला जेमी डोरनन यांची खूपच आठवण आली. पूर्ण टीमचे कधी न विसरणाऱ्या अनुभवासाठी धन्यवाद ! मला जे प्रेम दिले गेले आणि काळजी घेतली गेली त्यासाठी मी नेहमी आभारी राहील. तुमचा हा चित्रपट पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही. मात्र आता साठी मी घर परत येत आहे.

Web Title: Alia Bhatt Wraps Heart Of Stone Shoot Gal Gadot Happy Selfie Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..