Game of Thrones Actor Darren Kent Passes Away:  Esakal
मनोरंजन

Darren Kent Passes Away: गेम ऑफ थ्रोन्सच्या प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतला अखेरचा श्वास

Vaishali Patil

Game of Thrones Actor Darren Kent Passes Away:  हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेतून जगभर प्रसिद्ध झालेल्या डॅरेन केंट या अभिनेत्याचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


गेल्या शुक्रवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी या डॅरेन केंटने जगाचा निरोप घेतला. वयाच्या 36 व्या वर्षी त्याचे निधन झाल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

डॅरेन केंटच्या मृत्यूची पुष्टी त्याच्या टॅलेंट एजन्सी, कॅरी डॉड असोसिएट्सने मंगळवारी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी केली.

ही माहिती सोशल मिडियावर शेअर करताना, "कॅरी डॉड असोसिएट्स यांनी लिहिले की, 'आमचा प्रिय मित्र डॅरेन केंटचं शुक्रवारी निधन झालयं. अत्यंत दुःख मनाने ही बातमी आम्हाला कळवावी लागत आहे. त्याचे आई-वडील आणि जिवलग मित्र त्याच्यासोबत आहेत. या कठीण काळात आमचे प्रेम त्यांच्या कुटुंबासोबत आहे. माझ्या मित्राच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना करा"

अभिनेता डॅरेन केंटचा जन्म इंग्लंडच्या एसेक्स काउंटीमध्ये झाला होता. तिथेच तो वाढला. त्याने 2008 मध्ये 'मिरर्स' नावाच्या हॉरर चित्रपटात पहिली प्रमुख भूमिका होती. तर 2023 मध्ये, त्याने 'Dungeons & Dragons: Honor Among Thieves' या चित्रपटात महत्वाची भुमिका केली होती.

Snow White and the Huntsman', 'Marshal's Law', 'Bloody Cuts', 'The Frankenstein Chronicles', 'Blood Drive' and 'Birds Sorrow' या चित्रपटातही त्याने अभिनय केला होता. इतकच नाही तर तो उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकही होता. त्याने 2021 चा 'यू नो मी' हा लघुपट दिग्दर्शित केला होता ज्याला पुरस्कार देखील मिळाला होता.

'सनी बॉय' मधील डॅनीच्या भूमिकेसाठी केंटने 2012 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला होता. या चित्रपटात त्याने एका दुर्मिळ त्वचा रोग असलेल्या मुलाची भुमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भुमिकेप्रमाणेच केंट देखील ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात तसेच त्वचेच्या विकारांशीही झुंज देत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT