Ganapath Box Office Collection Day 1 Esakal
मनोरंजन

Ganapath Box Office Collection Day 1: टायगरचा 'गणपत' निघाला 'पांचट'! पहिल्या दिवशी कमावले फक्त...

Vaishali Patil

Ganapath Box Office Collection Day 1: टायगर श्रॉफ, क्रिती सेनन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी सिनेमा गणपतमुळे चर्चेत होते. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर रिलिज झाल्यानंतर टायगरचे चाहते या सिनेमासाठी खुप उत्सुक होते. काल 20 ऑक्टोबर रोजी गणपत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर सोशल मिडियावर या चित्रपटाची चर्चा होती.

एकीकडे टायगर आणि क्रितीच्या चाहत्यांना हा सिनेमा खुप आवडला तर दुसरीकडे समिक्षकांचा या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद होता. या सिनेमात फक्त अॅक्शन असून चित्रपटाला स्टोरीच नाही अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली होती.

150 ते 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना खुप जास्त अपेक्षा होत्या. मात्र आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता या चित्रपटाला फारच निराशाजनक ओपनिंग मिळाली असल्याचे दिसत आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'गणपत' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 2.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईकडे पाहता 'गणपत' हा टायगरच्या करिअरमधील सर्वात खराब ओपनिंग असलेला चित्रपट ठरला आहे.

टायगरच्या आधीच्या चित्रपटाच्या कमाईकडे पाहिले असता त्याच्या 'हिरोपंती 2' ने पहिल्या दिवशीची कमाई 6.50 कोटी आणि 'बागी 3' ने 17 कोटींची कमाई केली होती.

तेच त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटवर नजर टाकली असता त्याच्या 'वॉर' चित्रपटाने पहिल्या दिवशी 53.35 कोटींची आणि 'स्टुडंट ऑफ द इयर 2'ने 12.06 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे त्याच्या गणपत या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई खुपच खराब आहे, आता हे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आहे तर वीकेंडला शनिवार आणि रविवार आणि सुट्टीचा फायदा या चित्रपटाला मिळेल अशी आशा टायगरच्या चाहत्यांना आणि निर्मात्यांना आहे.

'गणपथ: अ हिरो इज बॉर्न' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. हा चित्रपट जगभरात हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. ज्यात टायगर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनन यांच्यादेखील मुख्य भुमिका आहे.

तर दुसरीकडे दिव्या खोसला कुमार दिग्दर्शित 'यारियां' चा सिक्वल असलेल्या 'यारियां 2' देखील बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचे दिसत आहे.

सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, 'यारियां 2' ने पहिल्याच दिवशी 60 लाख रुपये कमावले आहेत. या चित्रपटात दिव्या खोसला कुमार, पर्ल व्ही. पुरी, मीझान जाफरी आणि यशदास गुप्ता मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

Latest Marathi News Live Update : केरळ, आसामसह पुद्दुचेरीत आज एकाच टप्प्यात मतदान; सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

Chhatrapati Sambhajinagar: शहरात वर्षात ९४ हजार वाहनांची भर; दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक, आरटीओला ४५६ कोटींचा महसूल

Nashik: बड्या IT कंपनीत महिलेवर ५ वर्षे अत्याचार, महिलांना करायचे टार्गेट; ९ गुन्हे दाखल, ६ जणांना अटक

Chhatrapati Sambhajinagar: वेल्डिंग दोषामुळे ३ कोटी लिटर पाणी वाया; शहरात पाणी पुरवठा दोन दिवस उशिरा

SCROLL FOR NEXT