मनोरंजन

Ganapath Movie Review : टायगरच्या माकडउड्यांचा 'फुसका गणपत', आजारी पडलेली कथा अन् बरचं काही!

टायगरनं आतापर्यत जितक्या चित्रपटांमध्ये काम केले त्यातून त्यानं आपण फुल्ल टू एंटरटेनर असल्याचे दाखवून दिले आहे.

युगंधर ताजणे

Tiger Shroff Ganapath movie Review : बॉलीवूडमध्ये लोकप्रिय अॅक्शनहिरो म्हणून गेल्या काही वर्षात जितके अभिनेते समोर आले त्यात जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ सर्वाधिक लोकप्रिय ठरला. त्याच्यापेक्षाही स्वताची वेगळी ओळख विद्युत जामवालनं तयार केली. मात्र डान्समध्ये तो टायगरला आव्हान देऊ शकत नाही.

टायगरनं आतापर्यत जितक्या चित्रपटांमध्ये काम केले त्यातून त्यानं आपण फुल्ल टू एंटरटेनर असल्याचे दाखवून दिले आहे. टायगरनं रियल स्टंट करुन वेगळी ओळखही चाहत्यांच्या मनात तयार केली आहे. अनेकदा असे वाटून जाते की, टायगर जर हॉलीवूडमध्ये गेला तर तिथे बॉलीवूडपेक्षा जास्त लोकप्रिय होईल, त्याचे कारण असे की, त्याला बॉलीवूडमध्ये चांगली स्क्रिप्टच मिळत नाही. त्याचा पहिला हिरोपंती नावाचा चित्रपट बऱ्यापैकी हिट झाला होता.

टायगर बॉलीवूडमध्ये 'टायगर' म्हणून जो पुढे आला तो त्याच्या बागी नावाच्या चित्रपटामध्ये. त्यातील त्याचे स्टंट, अॅक्शन हे जबरदस्त होते. त्याला चाहत्यांचा मिळालेला प्रतिसादही जबरदस्त होता. वॉरमध्ये तो ऋतिकमध्ये चमकला होता. टायगरचा डान्स अफलातून आहे. तो कोणत्याही प्रकारचा डान्स तितक्याच प्रभावीपणे करु शकतो जितका ऋतिक करतो. अर्थात टायगरचा डान्समधील गुरु ऋतिक असल्याचे त्यानं अनेकदा सांगितले आहे.

सध्या टायगरच्या गणपतचं चाहत्यांनी दमदारपणे स्वागत केले आहे. त्याला प्रतिसादही मिळतो आहे. पण त्यात टायगरच्या उड्यांशिवाय दुसरे काहीही नाही. बिग बी अमिताभ बच्चन वेगळ्या भूमिकेत आहेत. क्रिती सेनॉन चमकली आहे. पण चित्रपटाला म्हणावी अशी प्रभावी, लक्षवेधी कथाच नसल्यानं टायगर कितीही दमदार वाटत असला तरी पटकथेचं आजारपण प्रेक्षकांना खटकू लागतं.

विकास बहल हा दिग्दर्शक त्याच्या प्रयोगशीलतेमुळे ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे. यापूर्वी त्यानं दिग्दर्शित केलेल्या चिल्लर पार्टी, क्वीन, सुपर ३० आणि गुड बाय सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना खूश केले होते. त्यातील क्वीन चित्रपटामुळे कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. आता बहल यांचा गणपत मात्र अनेक पातळ्यांवर अपयशी ठरताना दिसतो आहे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे अशक्त पटकथा आणि निरस संवाद.

टायगर श्रॉफची स्टंटबाजी, त्याची अॅक्शन, त्याचे पडद्यावर वावरणे आणि त्याची स्टाईल यामुळे चाहत्यांना काही वेळ बरे वाटू लागते. पण गणपतचे मिशन, त्याचा संघर्ष यात अनेक अडचणी येताना दिसतात. प्रेक्षकांना आपण फक्त टायगरच्या माकडउड्याच पाहतो आहोत असे वाटू लागते. कथेच्या नावानं बोंब आहे. डिस्टोपियन टाईपमधील स्टोरी त्यामुळे ती ज्या प्रकारे आपल्यासमोर येते त्यातून आपण फ्रेश नव्हे तर आणखी बोअर होऊन जातो.

काय आहे गणपतची स्टोरी?

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातून कथेला सुरुवात होते. त्यात ते सांगतात आता एका भयाण युद्धाला सुरुवात होणार आहे. त्यातून साऱ्या जगाचा नाश होणार आहे. मानवाचे अस्तिव धोक्यात आले आहे. यासगळ्याचा फायदा घेणारी लोकं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन एका बड्या शहराचे निर्माण करतात. तिथे ते मोठ्या ऐषोआरामात राहत आहेत. या सगळ्यात गरिबांवर मोठे अन्याय अत्याचार होत आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कोण आहे?

अराजक परिस्थितीला सामोरा जाण्यासाठी तो येतो. दलपती (अमिताभ बच्चन) बॉक्सर रिंगचा नियम बदलतात. त्यात आता लढाया फक्त बॉक्सिंग रिंगमध्येच होणार असे तो सांगतो. दलपती भविष्यवाणी करतो, गणपत येणार आणि सगळं बदलून टाकणार. आपले वाईट दिवस संपणार...असे म्हणून आणखी दुसऱ्या कथेला सुरुवात होते. कथेच्या दुसऱ्या ट्रॅकमध्ये गुड्डू (टायगर श्रॉफ) एका शहरात मस्त मजेत राहतो आहे. त्याच्या आयुष्यात वेगळे बदल घडू लागतात आणि सुरु होती ती गोष्ट....

असं हे सारं गणपतमध्ये दिसून येतं. त्यातून आपण सारखं या ट्रॅकवरुन त्या ट्रॅकवर जात राहतो. त्यात गोंधळून जातो. म्हणून त्यात टायगरच्या अॅक्शन स्टंटवरच आपल्याला समाधान मानावं लागतं. त्यातून काही अंशी गुड फिल होते एवढचं गणपत पाहून म्हणावे लागेल.

चित्रपटाचे नाव - गणपत

दिग्दर्शकाचे नाव - विकास बहल

कलाकार - टायगर श्रॉफ, अमिताभ बच्चन, क्रिती सेनॉन

रेटिंग - **1/2

------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT