ganapath teaser tiger shroff kriti sanon amitabh bachchan released on 20th october 2023 dussehra  SAKAL
मनोरंजन

Ganapath Teaser: दसऱ्याला रंगणार अनोखी लढाई..! टायगर, क्रिती, अमिताभ बच्चनच्या 'गणपत'चा टीझर रीलीज

टायगर श्रॉफ, अमिताभ बच्चनच्या गणपत चा टीझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Ganpath Teaser News: टायगर, क्रिती, अमिताभ बच्चनच्या गणपत सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या सिनेमाचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

सिनेमाचा टीझर आज २९ सप्टेंबरला १२.२० मिनिटांनी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आज सकाळपासूनच सोशल मिडीयावर गणपतच्या टीझरची चांगलीच हवा होती. अखेर सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

(ganapath teaser tiger shroff kriti sanon amitabh bachchan released on 20th october 2023 dussehra)

गणपतच्या टीझरमध्ये काय?

गणपतच्या टीझरमध्ये २०७० सालची गोष्ट दिसते. सिनेमाच्या टीझरमध्ये सुरुवातीला दिसतं की टायगर श्रॉफ ध्यान करायला बसलेला असतो. काही गुंड त्याला मारायला येतात. टायगर त्या गुंडांशी दोन हात करतो.

पुढे संपूर्ण टेक्नोलॉजीने भरलेलं एक शहर दिसतं. टायगर फाईटर म्हणून रिंगमध्ये बॉक्सिंग करताना दिसतो. दुसरीकडे क्रिती सेनॉन सुद्धा अ‍ॅक्शन अवतारात दिसते. याशिवाय एका वेगळ्याच लूकमध्ये अमिताभ बच्चन दिसून येतात. एकूणच अ‍ॅक्शनचा तडका असलेल्या गणपतचा टीझर एका अनोख्या दुनियेची सफर घडवून आणतो.

गणपतची तगडी स्टारकास्ट

'गणपत' या चित्रपटात टायगर श्रॉफ क्रिती सनॉनसोबत मुख्य भूमिका साकारतोय. या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल करतोय.

टायगर आणि क्रितीने 'हिरोपंती' या चित्रपटातही एकत्र काम केलं होतं. याशिवाय एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत अमिताभ बच्चन पाहायला मिळत आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर गणपत होणार रिलीज

गणपत या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. म्हणजेच २० ऑक्टोबरला संपूर्ण भारतात सिनेमा रिलीज होईल

विकास, वाशु भगनानी, दीप्शिका देशमुख आणि जॅकी भगनानी या चौघांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. गणपतच्या टीझर आल्यापासून सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT