Gandhi Jayanti 2023 Boman Irani insta post  esakal
मनोरंजन

Gandhi Jayanti 2023 : कोण आहे ओळखू येतंय का? गांधीजींच्या भूमिकेसाठी तब्बल ३० किलो वजन घटवलं!

यासगळ्यात एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची पोस्ट इंस्टावर व्हायरल झाली आहे.

युगंधर ताजणे

Gandhi Jayanti 2023 Boman Irani insta post : देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. यादिवसाच्या निमित्तानं स्वच्छता उपक्रमही हाती घेतले जातात. मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटी देखील गांधी जयंतीच्या निमित्तानं सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत.(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

यासगळ्यात एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याची पोस्ट इंस्टावर व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं आपण गांधीजींवर आधारित एका नाटकामध्ये त्यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल ३० किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. त्यांची ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून अनेकांना ते अभिनेते कोण आहेत हे ओळखताच आलेलं नाही. अभिनेत्यानं स्वत: त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानं अनेकांना त्यांचे नाव कळले आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

यापूर्वी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांनी महात्मा गांधीजींच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यात दिलीप प्रभावळकर, रजीत कपूर, नसिरुद्दीन शहा, दर्शन जरीवाला यांची नावं घ्यावी लागतील. त्यानंतर आणखी एका अभिनेत्यानं गांधींवरील एका नाटकामध्ये त्यांची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानं चक्क तीस किलो वजन कमी केलं. असे त्यांनीच त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ते अभिनेते दुसरे तिसरे कुणी नसून प्रसिद्ध अभिनेते बोमण इराणी हे आहेत. त्यांच्या त्या फोटोंनी अनेकांना कोड्यात पाडले आहे. कित्येकांना विश्वासच ठेवणं कठीण होऊन बसलं आहे की, ते बोमण इराणी आहेत ते... त्यांनीच पोस्ट शेयर करुन गांधींविषयी मोजक्याच शब्दांत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

बोमण यांनी म्हटले आहे की, गांधी जयंतीच्या निमित्तानं आम्ही एक नाटक करायचे ठरवले. गांधीजींनी सांगितलेली अनेक तत्व आपण दैनंदिन आयुष्यात फॉलो करत असतो. ती तत्वं तुम्हाला जगण्यासाठी यासाठी खूपच मदत करतात. आम्ही फिरोज खान यांच्या महत्मा व्हर्सेस गांधी हे नाटक करत होतो.

मला या नाटकासाठी तब्बल ३० किलो वजन कमी करावे लागले. ही माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट होती. यासगळ्यातून आयुष्याला सामोरे जाण्याचे अनेक धडे मी घेतले. आणि खूप काही शिकायला मिळाले. अशा शब्दांत बोमण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT