ganesh chaturthi 2022 shah rukh khan and son abram welcome ganpati home
ganesh chaturthi 2022 shah rukh khan and son abram welcome ganpati home  
मनोरंजन

शाहरुख खानच्या घरी गणरायाचे आगमन, कुटुंबाने केली प्रतिष्ठापना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहरुख खानच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. शाहरुखने त्याच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या घरी गणपतीचे आगमण झाल्याचे दिसत आहे.

गणेशमूर्तीचा फोटो शेअर करत शाहरुख खानने ट्विटरवर, मी आणि लहानग्याने (अबराम) गणपतीजींचे घरी स्वागत केले असे शाहरुखने म्हटले आहे. त्यानंतर त्याने मोदकांचा आस्वाद घेतल्याचे देखील म्हटले, पुढे त्यांनी लिहीले की, यातून एक शिकवण मिळते ती अशी की, मेहनत, चिकाटी आणि देवावर श्रद्धा असेल तर तुम्ही तुमची स्वप्न पुर्ण करु शकता असे त्याने म्हटले आहे. यासोबतच शाहरुखने सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने शेअर केलेल्या या फोटोमध्ये बाप्पासोबत त्याची आणि मुलाची थोडीशी झलक देखील पाहायला मिळत आहे.

शाहरुख खान जवळजवळ दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत करतो. शाहरुख प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो, मग ती ईद असो, दिवाळी असो की गणेश चतुर्थी.

शाहरुखच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो त्याच्या आगामी 'पठान आणि जवान या अगामी चित्रपटात व्यस्त आहे. शाहरुख बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, त्यामुळे त्याचे चाहते या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT