sunil grover 
मनोरंजन

गँग्स ऑफ फिल्मीस्तान: सुनील ग्रोवर यावेळी डॉक्टर नाही तर गँगस्टर बनून हसवण्यासाठी सज्ज

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुनील ग्रोवरच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 'द कपिल शर्मा शो' सोडल्यानंतर ब-याच कालावधीनंतर सुनील ग्रोवर छोट्या पडद्यावर परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. सुनील 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' या नवीन कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना लोटपोट करण्यासाठी लवकरंच येत आहे. खास गोष्ट अशी की या कॉमेडी शो मध्ये त्याच्यासोबत शिल्पा शिंदे, संकेत भोसले, सुगंधा मिश्रा, उपासना सिंह, जतिन सूर आणि सिद्धार्थ सागरसोबतंच पारितोष त्रिपाठी देखील असणार आहे. हा शोचा प्रोमो नुकता रिलीज केला गेला असून यात हा शो कुठे आणि कधी पाहायला मिळणार याविषयीची माहिती आहे.

कॉमेडियन सुनील ग्रोवरने स्वतः या कॉमेडी शोचा प्रोमो ट्विटरवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी सुनील डॉक्टरच्या नाही तर गँगस्टरच्या भूमिकेत दिसून येतोय. या प्रोमोमध्ये सगळे कलाकार हसताना दिसतायेत. या प्रोमो शेअर करताने त्याने लिहिलंय, 'तुमच्या प्रत्येक श्वासात हास्य भरण्यासाठी येत आहेत कॉमेडीचे हे महारथी. आम्ही येत आहोत एक तास नॉनस्टॉप कॉमेडी घेऊन 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान'मध्ये. ३१ ऑगस्टपासून रात्री ८ वाजता स्टार भारत वर.'

हा प्रोमो नीट पाहिला तर लक्षात येईल की शिल्पा शिंदे 'हम आपके है कौन'मधील माधुरी दिक्षीतच्या अंदाजात तर संकेत भोसले सलमान खानच्या लूकमध्ये दिसून येत आहेत. इतर कलाकारांमध्ये एक जण 'बाहुबली'मधील कट्टपाच्या लूकमध्ये दिसतोय. उशीरा का होईना सुनील ग्रोवर पुन्हा एकदा नव्या अंदाजा प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. मात्र आता टीआरपीच्या रेटींगमध्ये हा शो 'द कपिल शर्मा शो'ला टक्कर देऊ शकेल का? हे येणारा काळच सांगू शकेल.  

gangs of filmistan sunil grover comedy show promo when and where to watch gangs of filmistan  
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT