Salman Khan Lawrence Bishnoi's radar  esakal
मनोरंजन

सलमानने माफी मागावी अन्यथा.. ; गँगस्टरची पोलिसांसमोरच धमकी

'सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी माफ करु नका'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : तुरुंगात असलेला गँगस्टर लाॅरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने आपल्या समाजाला बाॅलीवूड कलाकार सलमान खान जोपर्यंत तो काळवीट मारल्याप्रकरणी जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत क्षमा न करण्याचे सांगितले. काळवीट हा बिश्नोई समाजासाठी पवित्र असतो. याबाबत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने रविवारी माहिती दिली. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी बिश्नोईने चौकशी दरम्यान पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणी हे स्पष्ट केले. सलमान खानचा (Salman Khan) वकील हसतीमल सारस्वत यांना काळवीट शिकार प्रकरणी जीवे मारण्याची धमकी पत्र बिश्नोई गँगकडून पाठवले गेले असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Gangster Lawrence Bishnoi Said The Community Won't Forgive Actor Salman For Blackbuck Poaching)

सिद्धू मुसेवाला यासारखे परिणामाला सामोरे जाईल तयार राहा असा इशारा वकिलांना दिल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्याने स्पष्टपणाने सांगितले की, बिश्नोईनुसार काळवीट हे धर्मगुरुच्या रुपात म्हणजे भगवान जम्बेश्वर पुनर्जन्म घेते. भगवान जम्बेश्वर हे जाम्बाजी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्या निर्दोष सुटका किंवा शिक्षेबाबत न्यायालयाने अद्यापही आपला अंतिम निकाल दिलेला नाही, असे विशेष आयुक्त (विशेष सेल) एचजीएस धलिवाल यांनी सांगितले. तो म्हणाला अभिनेत्याने व त्याच्या वडिलांनी जाहीरपणे जाम्बाजी मंदिरात माफी मागावी अन्यथा बिश्नोई त्यांची हत्या करेल.

पोलिस उपायुक्त (विशेष सेल) प्रमोद खुशवाह यांनी गँगस्टरची वेगवेगळ्या प्रसंगी चौकशी केली आहे. ते म्हणाले, त्याचा जन्म पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील धत्तरणवाली येथील सुस्थितीतील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्याच्या गँगमधील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की त्याला १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणी खानचा मारुन बदला घ्यायचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT