gangubai kathiawadi
gangubai kathiawadi 
मनोरंजन

Video : गंगुबाईचा नाद खुळा! टीझरनं लावलं वेड

स्वाती वेमूल

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी' या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलियाची मध्यवर्ती भूमिका असून ती गंगुबाई काठियावाडी हे पात्र साकारतेय. भन्साळींच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा नवीन पोस्टर, प्रदर्शनाची तारीख व टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये आलिया भट्ट सर्वत्र दिसत असून तिच्या दमदार अभिनयाची छाप पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर पडेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?
हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातून भन्साळींना गंगूबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या मूळच्या गुजरातच्या होत्या. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमविवाह करून त्या मुंबईत पळून आल्या होत्या. मात्र त्यांच्या पतीने केवळ ५०० रुपयांसाठी त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करताना गंगुबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधत भाऊ मानलं. त्या घटनेनंतर करीम लालाने अवघा कामाठीपुराच गंगुबाईच्या हातात दिला, असं म्हटलं जातं. गंगुबाईंनी वेश्या व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नव्हता, असंसुद्धा सांगितलं जातं. इतकंच नव्हे तर जेव्हा मुंबईतून वेश्या व्यवसाय काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाच्या नेतृत्वासाठी गंगुबाईंनी पुढाकार घेतला होता. 

आलिया पहिल्यांदाच एका बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारतेय. याचसोबत तिचा भन्साळींसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. तिचा लूक, तिचं अभिनय अगदी नजरेत भरणारं असल्याने त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. आलियाला गंगुबाईंच्या भूमिकेत पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच असेल. हा चित्रपट येत्या ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT